जागतिक महिला दिनी कॉग्रेस कडून विद्यार्थिनीला आर्थिक मदतडोंबिवली ( शंकर जाधव ) जागतिक महिला दिनानिमित्त कल्याण डोंबिवली काँग्रेस कमिटी सरचिटणीस शामराव भगवान यादव यांनी स्काय फॉउंडेशन व गोल्डन हॉस्पिटल यांच्यावतीने लोढा -पलावा महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. महिलांच्या आरोग्य विषयक प्रश्नांची गोल्डन हॉस्पिटल व डॉ. आश्वाथा यांनी योग्य मार्गदर्शन केले. स्वच्छताआरोग्य व शिक्षणासाठी शामराव यादव हे नेहमीच काहींना काही करत असतात. 


             तर महिला दिनानिमित्त दोन मुलींचा त्यांनी सत्कार करण्यात आला. मंजुनाथ महाविद्यालयातील टीवायबीकॉममध्ये पहिली आलेली साक्षी तांबे हिचा सत्कार केला.तर प्रियांका त्रिपाठी या  विद्यार्थिनीला सीए करण्यासाठी आर्थिक अडचण येत होती. तिला मदतीचा हात पुढे करत  शामराव यादव यांची संस्था स्काय फॉउंडेशन दरमहा दहा हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले..


         महिना दिनी तिला दहा हजार रुपयांचा  धनादेश सुपूर्द करण्यात आला. वर्षा कांबळेचंदा यादवश्रुतीका काटेअश्विनी यादवमाधुरी कांबळेदीपा मोरे,सुजाता काटे,दिपाली कांबळेकरुणा रुके,विलास कांबळेसागर काटेमंगेश रुकेविशाल रुकेसंकेत कांबळेमनोज यादव कुणाल वाघमारेसंजय मोरेअंकुश मोरेआकाश काटे आदींचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments