नागरी समस्यां संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी घेतली अतिरिक्त आयुक्तांची भेट

■पाटीदार भवनातील आरोग्य साहित्य धूळखात पडून अनधिकृत बांधकामांमुळे पलावा जंक्शन येथे वाहतूक कोंडी कल्याण ग्रामीण भागातील पाणी आणि कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी..


कल्याण : कल्याण ग्रामीण मतदार संघातील आणि केडीएमसी क्षेत्रात उद्भवलेल्या समस्यांच्या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांची भेट मागितली होती. मात्र गेले अडीच महिने आयुक्तांची भेट मिळत नव्हती म्हणून त्यांनी शेवटी अतिरिक्त आयुक्तांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा केली. पाटीदार भवनातील आरोग्य साहित्य धूळखात पडून आहे. अनधिकृत बांधकामांमुळे पलावा जंक्शन येथे वाहतूक कोंडी असून कल्याण ग्रामीण भागातील पाणी आणि कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली.  


कोरोना काळात केडीएमसीला पाटीदार समाजाने दावडी येथील आपल्या समाजाचे भवन दिले होते. कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊन महिने उलटले. आता या भवनातील आरोग्य यंत्रणा धूळ खात पडून अनेक ठिकाणी भवनाची दुरावस्था झाली आहे. या भवनाला सोमवारी राजू पाटील यांनी भेट देऊन केडीएमसी शहर अभियंता आणि अतिरिक्त आयुक्तांना ज्या ठिकाणी दुरावस्था झाली आहे त्या दुरुस्त करून देण्याची सूचना केली आहे.


 पलावा जंक्शन येथील अनधिकृत बांधकामामुळे कल्याण शीळ रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याबाबतीत प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी  एका खासदाराकडे बोट दाखवले. मात्र हे प्रभाग क्षेत्र अधिकारी आजारी असल्याचे कारण देत बैठकीत अनुपस्थित राहिल्याचा आरोप पाटील यांनी केला असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मला कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या कारवाईची मी वाट बघत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


कल्याण ग्रामीण भागातील देशमुख होम्ससंदपभोपर परिसरातील नागरिकांच्या पाणी आणि कचरा समस्यांबाबत एमआयडीसी आणि केडीएमसी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांवर तोडगा काढण्याचे आदेश दिले. जिथे अडचणी येतील तिथे  मी या अडचणी दूर करण्यासाठी खंबीरपणे उभा राहणार अशी ग्वाही राजू पाटील यांनी प्रशासनाला दिली.


           कल्याण येथील रस्ते प्रकल्पग्रस्त व ज्येष्ठ नागरिक गेल्या सहा दिवसापासून केडीएमसी मुख्यालयाबाहेर आंदोलन करत होते. याबाबतीत शहर अभियंता सपना कोळीअतिरिक्त आयुक्त आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन केडीएमसी प्रशासनाने दिले. यावेळी मनसेचे स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments