रिअल स्पोर्टस फाउंडेशनचे उद्‌घाटन गरजू खेळाडूंमधील क्रीडा गुणांना मिळणार वाव


कल्याण : समाजातील गरजू खेळाडूंना मदतीचा हात देणाऱ्या राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून रिअल स्पोर्टस फाऊंडेशनची नुकतीच स्थापना करण्यात आली.  या संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन माजी रणजी क्रिकेटर गोपाळ कोळी व रबी घडीयार यांच्याहस्ते करण्यात आले.


             या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कामगार नेते अभिजीत राणेएमआयजी क्रिकेट क्लब प्रशांत शेट्टी,  नॅशनल क्रिकेट अकादमी प्रशिक्षक उदयसिंह भोसलेब्रम्हाकुमारीज क्रिडा समुपदेशक जयश्री दिदी, मुंबई महीला प्रशिक्षक बनी सलील, बाबर देसाईतसेच विशेष उपस्थिती म्हणून कबड्डी खेळात छत्रपत्ती क्रीडा पुरस्कारप्राप्त चंद्रकांत शेटे हे उपस्थित होते. रिअल स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने आयुष म्हात्रे या स्टेट खेळाडू चा देखील सम्मान करण्यात आला.


या कार्यक्रमाच्या प्रसंगी कामगार नेते अभिजीत राणे यांनी सांगितले कीगुणवत्तेच्या जोरावर खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कला गुणांची चमक दाखवावी. प्रसिद्धी माध्यम आणि वैयक्तीक ही आपल्याकडून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाईल असे प्रतिपादन केले. तर प्रशांत शेट्टी यांनी आपल्या भाषणात खेळाडू कसा घडतो या बद्दल उपस्थित मुलांना मार्गदर्शन केले. उदयसिंह भोसले यांनी पालकांसाठी मुलांना घडवतांना कशी काळजी घ्यावी या बद्दल मार्गदर्शन केलेबम्हाकुमारी दीदी यांनी खेळाच्या मानसिक आरोग्याचे विश्लेषण केले व मेडीटेशन केल्याने खेळाडूला काय फायदा होतो याचे विश्लेषण केले.


या कार्यक्रमात गोपाळ कोळी यांनी मुलांना यशाचा कानमंत्र दिला तर रवी घडीवार सरांनी या उपक्रमाचे खुप कैतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल कुलकर्णी व आभार प्रदर्शन राकेश कोहली यांनी केले. या रीअल स्पोर्टस फाउंडेशनचे कार्यालय पाटील अपार्टमेंट चे कार्यालयखोज गल्लीमाहीप मुंबईयेथे असणार आहे.

Post a Comment

0 Comments