कामगारांच्या सुरक्षेसाठी कामा सरसावली कामा संस्थेच्या वतीने इमर्जन्सी कंट्रोल सेंटरची स्थापना


कल्याण  : डोंबिवली एमआयडीसीमध्ये  कामा संस्थेच्या वतीने इमर्जन्सी कंट्रोल सेंटरची स्थापना करण्यात आली असून यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास याची मदत होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त कामा संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


         त्यावेळी ही इमर्जन्सी कंट्रोल सेंटरची स्थापना करण्यात आली. तसेच यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे विविध प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. यावेळी कामा संघटना अध्यक्ष देवेन सोनी, उपाध्यक्ष राजू बेलूर, बापजी चौधरी, उदय वालावलकर, आशिष भानुशाली आदी पदाधिकारी उपस्थित होते.


             डोंबिवली एमआयडीसी परिसरात असणाऱ्या कारखान्यात दुर्घटना होत आसतात. त्यावेळी सुरक्षेचे साधन लवकरात लवकर उपलब्ध असेल तर या दुर्घटनेत मानवी हानी व दुर्घटनेपासून होणाऱ्या तीव्रतेचे प्रमाण कामा संस्थेने  स्थापलेल्या इमर्जन्सी कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून कमी करण्यास मदत होणार आहे. त्यासाठी त्यांनी त्यांनी इमर्जन्सी फोन नंबर सुधा उपलब्ध केले आहेत.


           या मध्ये आगीपासून सरंक्षण होण्यासाठी सुट आहेत. त्याच प्रमाणे  वायू गळती झाली तर आत जाण्यासाठी विशेष असे ऑक्सिजन टॅंक  असलेला सुट देखील आहे. तर हेल्मेटला कॅमेरा लावण्यात येणार असून यामुळे कंट्रोल रूम मधून देखील दुर्घटना स्थळाची परिस्थिती हाताळता येणार असून संपूर्ण एमआयडीसीमध्ये दोन मोठ्या टॉवरवर कॅमेरे लावून एमआयडीसी वर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

 
         या इमर्जन्सी कंट्रोल सेंटरचे नंबर प्रत्येक कारखान्याच्या गेट वर लावण्यात येणार आहेत. यामुळे  काही दुर्घटना झाली तर तेथील कामगार सुद्धा फोने करून या इमर्जन्सी कंट्रोल  रूमशी संपर्क साधून मदत मिळवू शकतात आशी माहिती कामाचे  अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments