पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच बाबत मार्गदर्शन कल्याण लोकसभा युवती सेनेचे आयोजन


कल्याण : लहान मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असून बहुतांश वेळा लहान मुलांना याबाबत माहिती नसल्याने या घटना घडत असून घटना घडल्यानंतर हे प्रकार उघडकीस येत असतात. त्यामुळे असे प्रकार घडूच नयेत यासाठी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गुड टच  बॅड टच बाबत तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. कल्याण लोकसभा युवती सेनेच्या वतीने कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या जाईबाई शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली मोरे साबळे यांनी यावेळी १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


यावेळी माजी नगरसेविका सारिका जाधव, माजी नगरसेवक राजाराम पावशे, शरद पाटील, शोभा पावशे, समाजसेवक सतीश जाधव, अरुण निंबाळकर, नामदेव साळवे, गणपत घुगे, सिस्टर इन्चार्ज उर्मिला कासकर, अशोक कुबल, दत्ता आहेर, युवती सेना जिल्हा समन्वयक तेजस्वी पाटील, विधानसभा चिटणीस रचना मालुसरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. देशातील ५३ टक्के मुलांचे लैंगिक शोषण होत असते त्याकरिता चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल मुलांना शिक्षित करून समाजात वाढत्या बाल विनयभंगाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती युवती सेना जिल्हा समन्वयक तेजस्वी पाटील यांनी दिली.


तर १ ली ते ७ वी च्या विद्यार्थांना हा महत्त्वाचा विषय असून चांगलं काय आणि वाईट काय हे मुलांना समजत नसून या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना गुड टच बॅड टच बाबत समजविण्यात आले. आपले शरीर हे आपली वैयक्तिक संपत्ती असून आपल्या सोबत अशाप्रकारे काही वाईट झाल्यास काय करावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना बाहेर पाठवताना पालकांनी त्यांना माहिती देणे आवश्यक असून कधी कधी पालकांनाच गुड टच बॅड टच बाबत माहिती नसते त्यामुळे त्यांनी देखील हि माहिती करून घेणे आवश्यक असून शिक्षकांनी देखील दर आठवड्याला विद्यार्थांना याबाबत माहिती देऊन उजळणी करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. दिपाली मोरे साबळे यांनी सांगितले.      


Post a Comment

0 Comments