विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) जागतिक महिला दिनानिमित्त डोंबि वली जवळील मेट्रो जंक्शन मॉलमध्ये  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करून गौरविण्यात आले.या सोहळ्यात  ‘इंडियन आयडॉल – मराठी’ स्टार गायक अनिकेत घनगव यांची विशेष उपस्थिती होती.


         पत्रकारितेत निर्भीडपणे आपल्या लेखणीतून अन्यायाला वाचा फोडणाऱ्या महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राच्या महिला पत्रकार राजलक्ष्मी पुजारे- जोशी, कचऱ्याची समस्या सोडविण्यास पुढाकार घेऊन काम करत असलेल्या  रेखा लाके ,स्केटिंगमध्ये 10,750 लॅप्स पूर्ण करण्याचा विक्रम नोंद झालेली  आस्था नायकर, महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ले ट्रेकिंगसाठी पुरस्कार प्राप्त ११ वर्षीय श्रावणी गायकवाड , प्रसिद्ध लावणी नृत्यांगना विजया कदम, पालिकेत अभियंता पदावर कार्यरत असलेल्या  सपना कोळी ,पिडब्लूडी विभागात एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेल्या अभियंता अनिता परदेशी  आणि कोरोना महामारीत 
प्रशंसनीय कार्यासाठी पुरस्काराने सन्मानित केलेल्या  वंदना लोखंडे यांना सोहळ्यात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments