कल्याणच्या भौतिक सुविधांसह अनेक योजनांवर काम करणार - नरेंद्र पवार

■शाही मकबरा चौकाच्या लोकार्पण सोहळ्यात नरेंद्र पवार यांचे प्रतिपादन..


कल्याण : कल्याण पश्चिमच्या विकासाचा अजेंडा घेऊन गेली अनेक वर्षे भाजपा आणि मी स्वतःही काम करत आहोतमी आमदार असताना शहरात अनेक विकासकामे केलीआज ज्या चौकाचे लोकार्पण करत आहे तेही माझ्याच आमदार निधीतून झालेले आहे. सर्व सामान्य कल्याणकरांसाठी आणि कल्याणच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या शहराच्या विकासाची जबाबदारी आमची असल्याचे मत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले.


कल्याण पश्चिम येथील शाही मकबरा चौकाचे सुशोभीकरण माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या आमदार निधीतून करण्यात आले. त्या चौकाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते आज संपन्न झाले. शिवसेना माजी नगरसेवक सचिन बासरे व सुधीर बासरे हे यासाठी सतत प्रयत्नशिल होते. एकतेचा आणि बंधुत्वाचा संदेश देणारे शिल्प या चौकामध्ये बसविण्यात आले आहे. सामाजिक संदेश देणाऱ्या चौकाचे सुशोभीकरण केल्याचा आनंद असल्याचे मतही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दरम्यान बोलताना व्यक्त केले.


यावेळी शिवसेना माजी नगरसेवक सचिन बासरेसुधीर बासरेकल्पेश जोशीसदा कोकणेडॉ.पकंज उपाध्यायप्रताप टूमकरज्योती भोईरनिता देसलेसंजू जैनजमशेद खान,जकिर शेखअहमद शेखजमील शेख  प्रसन्न कापसेश्याम मिरकुटेसंजय कारभारी आदी. पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments