गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक


डोंबिवली (शंकर जाधव) आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी एका इसमाने उत्तरप्रदेश येथून गावठी कट्टा  विक्रीसाठी आणून तो मुंब्रा येथील निर्जन स्थळी लपवून ठेवला असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


             कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी  परिसरात राहणारा सोनू गुरुप्रसाद पटवा (३०) असे या आरोपीचे नाव आहे. हा सराईत चोरी करत असल्याची माहिती  बातमीदाराकडून पोलिसांना सांगण्यात आली. त्यानुसार चौकशी केली असता या इसमाने आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी उत्तरप्रदेश येथून  गावठी कट्टा मुंबईत विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. त्यानंतर सखोल चौकशी केल्यानंतर हा आरोपी पूर्वी राहत असलेल्या दिवा-अगासान रोडवरील निर्जन स्थळी हा गावठी कट्टा लावल्याचे कबूल केले. 


        त्याने  दिलेल्या पत्त्यावर जाऊन पोलिसांनी गावठी कट्टा ताब्यात घेतला आहे. या आरोपीवर हत्यार कायद्याचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आनंद रावराणे व त्याचे सहकारी पोउनि मोहन कळमकर, पोउनि नवनाथ कवडे, सहा. पोउनि संजय माळी, बापुराव जाधव, विश्वास माने, बागुल, रमाकांत पाटील, किशोर पाटील, कामत, शिंदे, मपोहवा जाने, हुडेंकरी, महेश साबळे, गुरूनाथ जरग, विनोद चन्ने, विजेंद्र नवसारे, मिथुन राठोड, राहुल ईशी यांनी केली.

Post a Comment

0 Comments