वेळीच भारत सरकारने तत्परता दाखवली असती तर युक्रेनमधील अडलेले विद्यार्थी मायदेशी असते राष्ट्रवादीचा आरोप


डोंबिवली ( शंकर जाधव ) सात दिवसांपासून रशिया –युक्रेनचा युद्ध सुरु आहे.युक्रेन मधील परिस्थिती दिवसेंदिवस वाईट वाईट होत असताना येथे अनेक भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत.यातील ४ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात आले आहे. मात्र वेळीच भारत सरकारने तत्परता दाखवली असती तर युक्रेनमधील अडलेले विद्यार्थी मायदेशी असते असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी बोलताना केला.

 

        डोंबिवलीत सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी  राष्ट्रवादी प्रवक्ते तपासे यांच्याशी बोलताना माहिती दिली. तपासे म्हणाले, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यास भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.सुमारे २० हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.त्यातील ४ हजार विद्यार्थ्यांना देशात परत आणण्यास भारत सरकारला यश आले आहे. या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील विमानतळावर गेलो होतो. भारतात आलेल्या विद्यार्थ्यांचे आम्ही स्वागत केल्यावर त्यांना कोणतेही प्रश्न न विचारला प्रथम त्यांना काय हवे आहे ? तिथल्या इतर विद्यार्थ्यांशी आपले बोलणे झाले आहे यावर थोडा वेळ चर्चा केली.

 

       तपासे पुढे म्हणाले, रशिया-युक्रेन मध्ये युद्धसदृश परिस्थिती साधारण जानेवारीच्या शेवटच्या आठवडापासून सुरुवात झाली होती. १५ फेब्रुवारीला भारतीय परराष्ट्र मंत्रालयातून युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना अॅडव्हयाझरी दिली होती.`युक्रेन तातडीने सोडा` असे कुठेही नमूद केले नाही. `युक्रेन मध्ये शक्य असल्यास अंतर्गत प्रवास टाळा` असे म्हंटले आहे. आज भारत सरकार आज जी तत्परता दाखवत आहे. भारतीय वायू सेना रवाना करत आहे, भारत सरकार चार-चार मंत्र्यांना रवाना करत आहे., तीच तत्परता १७-१८ फेब्रुवारीला दाखवली असती तर २० हजार भारतीय विद्यार्थाही मायदेशी परतले असते.

  

        इतिहास पहिला तर इराणने कुवेतवर हल्ला केला होता त्या काळात अडकलेले १ लाख ७० हजार भारतीयांना अवघ्या ४० दिवसात मायदेशी परत आणण्यास वायू सेना आणि तत्कालीन सरकारने केले होते.तत्परता उशिरा दाखवली म्हणून दुर्देवाने भारतात अनेक विद्यार्थीअडकले आहेत. विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहता त्याच्यासमोर मंत्री विमानात प्रचाराचे भाषण करत होते. मला तर मोदी सरकारचे आश्चर्य वाटते. 


     मोदि सरकार हे इव्हेंटमेनेजमेन्ट सरकार आहे असे दिसते.दुर्देवाने भारतातील कर्नाटक मधील एका विद्यार्थ्यांच्या युक्रेनमध्ये युद्धात जीव गेला.त्याच्या कुटुंच्याच्या दुखात सहभागी आहोत.मात्र वेळीच भारत सरकारने तत्परता  दाखवली असती आज हा विद्यार्थी आपल्यात दिसला असता.

Post a Comment

0 Comments