भिवंडीत शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख पदी प्रदीप पवार यांची निवड, शहर प्रमुख सुभाष माने यांनी दिले नियुक्ती पत्र


भिवंडी दि 6 (प्रतिनिधी ) शहरातील  अजयनगर येथील शिवसेनेच्या मध्यवती कार्यालयात सुभाषनगर इथं राहणारे प्रदीप पवार यांची  शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली असून शिवसेना शहर प्रमुख  सुभाष माने यांच्या हस्ते एका कार्यक्रमात  नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी माजी आमदार रुपेश म्हात्रे आणि महापालिकेचे स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे यांनी प्रदीप पवार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे .


          यावेळी महानगर प्रमुख श्याम पाटील,सचिव महेंद्र कुंभारे, उपशहर प्रमुख राम शिगवण, राजू गोलांडे,नवनाथ लगड,जितेंद्र पाटील,कैलास वाल्हेकर, संतोष नागपुरे, भूषण पांचाळ, अमोल लगड, हरी गोलांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान प्रदीप पवार यांनी शिवसेनेच्या स्टाईल मध्येच नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असून मला जबाबदारी दिलेल्या क्षेत्रात कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे अश्वासन दिले आहे....

Post a Comment

0 Comments