भिवंडी महापालिकेचा ८४२ कोटी २९ लाख ४७ हजार रकमेचा अर्थसंकल्प महासभेत सादर


भिवंडी , प्रतिनिधी  | भिवंडी महापालिकेचा सन २०२२ - २३ या आर्थिक वर्षाचा ८४२ कोटी २९ लाख ४७ हजार रुपये रक्कमेचा अर्थसंकल्प बुधवारी झालेल्या विशेष अर्थसंकल्पीय महासभेत स्थायी समितीचे सभापती संजय म्हात्रे यांनी महापौर प्रतिभा पाटील यांच्याकडे सादर केला.


या विशेष अर्थसंकल्पीय महासभेस पालिका आयुक्त सुधाकर देशमुख , अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे , उपमहापौर इम्रानवली मोहम्मद खान, सभागृह नेता सुमित पाटील, कोणार्क विकास आघाडी गटनेते विलास पाटील, काँग्रेस गटनेते शकील पापा,  उपायुक्त दीपक झिंजाड, उपायुक्त दीपक पुजारी,  शहर अभियंता एल पी गायकवाड , लेखा व वित्त अधिकारी किरण तायडे, मुख्य लेखा परीक्षक श्रीकांत अनारसे, बांधकाम लेखा परीक्षक काशिनाथ तायडे, नगरसचिव अनिल प्रधान, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांच्यासह पालिका अधिकरी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


या अर्थसंकल्पात एकूण महसूल उत्पन्नातून बांधील खर्च वजा जाता उर्वरीत रक्कमेवर 5 टक्के रक्कम  दुर्बल घटक, महिला बाल कल्याण, अंध दिव्यांगां कल्याण या अंतर्गत  प्रत्येकी  86 लाख 30 हजार रक्कम ठेवण्यात आली आहे . रस्ते व पदपथ दुरुस्तीसाठी 9 कोटी इतकी तरतूद ठेवण्यांत आलेली आहे.


मनपा इमारती दुरुस्तीसाठी 5 कोटी 68 लाख 97 हजार वार्षिक निविदा रोड मटेरिअल,चेंबर कव्हर साठी 3 कोटी 75 लाख 87 हजार मनपा इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट 3 कोटी दिवाबत्ती दुरुस्ती व देखभाल या लेखा शिर्षाखाली 2 कोटी नगरसेवक निधी 8 कोटी 95 लाख 16 हजार  महापौर निधी 2कोटी, उपमहापौर व   स्थायी समिती सभापती प्रत्येकी 50 लाख व 5 प्रभाग समिती साठी प्रत्येकी 1 कोटी अशी 8 कोटी ची तरतूद आरोग्य विषयक जंतूनाशक व इतर वस्तू खरेदी साठी 2 कोटी इतकी तरतूद  घनकचरा व्यवस्थापनासाठी  15 कोटी निवडणूक खर्चासाठी 10 कोटी इतकी तरतूद ठेवण्यांत आली. 


नवीन  इमारत बांधण्यासाठी 3 कोटी 60 लाख इतकी तरतूद ठेवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन पुतळा उभारणे कामी रक्कम 3 कोटी ची तरतूद करण्यात आली आहे. शहरात  नविन रस्ते व फुटपाथ बांधण्यासाठी 5 कोटी 74 लाख तर नाले व गटार दुरुस्तीसाठी 3 कोटी 90 लाख इतकी तरतूद ठेवण्यात आली आहे. 


या अर्थ संकल्पात शहराच्या सर्वांगीण विकासा कडे लक्ष देण्यात आले आहे असे स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे यांनी आपल्या  अर्थसंकलपीय भाषणात  नमूद केले. या नंतर दुपारच्या सत्रात अंदाजपत्रकावर चर्चा सुरू झाली.

Post a Comment

0 Comments