कल्याण रेल्वे यार्डात झाडाला लागली आग आग आटोक्यात मात्र घटना स्थळी पोहचताना अग्निशमन दलाच्या पार्किंगचा अडथळा


कल्याण : कल्याण रेल्वे यार्डात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एका मोठ्या झाडाला अचानक आग लागली. याबाबत अग्निशमन विभागाला माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या मात्र रेल्वे परिसरातील पार्किंग साठी उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांमुळे घटना साठी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचेपर्यन्त होमगार्ड ने आग विझवली.


       कल्याण रेल्वे स्थानकातील पूर्वेकडील भागात असलेल्या रेल्वे यार्ड परिसरातील एका झाडाला दुपारच्या सुमारास अचानकपणे आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी त्वरित पालिकेच्या अग्नीशमन दलाला तत्काळ माहिती कळविल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेतली. दरम्यान घटना स्थळी पोहचण्यासाठी अग्निशमन दलाला तारेवरची कसरत करावी लागली. 

    

        रेल्वे पार्किंग मध्ये रस्त्याच्या कडेला दुचाकी गाड्याची पार्किंग असल्याने गाड्या वेळेत पोचू शकल्या नाहीत. सुदैवाने आग किरकोळ होती मात्र मोठी आग लागली असती तर अनर्थ घडला असता. याबाबत रेल्वे प्रशासनाला लेखी कळवण्यात येईल असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments