कल्याण : राहनाळ गावचे माजी सरपंच राजेंद्र गोपीनाथ भोईर यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी नेत्रचिकित्सा, दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना वह्या, चॉकलेट, टूथ ब्रश, टूथपेस्ट यांचे वाटप करण्यात आले. शाळेतील सव्वादोनशे विद्यार्थ्यांनी या शिबिराचा आणि वस्तूंचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाला तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नामदेव पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष जगदीश पाटील, राहनाळ गावचे सरपंच राजेंद्र मढवी, पंचायत समितीचे सदस्य भानुदास पाटील, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष जगदीश म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य सपना भोईर, पंचायत समिती सदस्य ललिता पाटील, हनुमान नाईक, प्रताप पाटील, मंगेश उबाळे, पोलिस पाटील राकेश गायकवाड हे उपस्थित होते.
राजेंद्र भोईर यांनी राष्ट्रपुरुषांचे फोटो शाळेस भेट दिले. शैक्षणिक, सामाजिक जाणीव ठेवून राजेंद्र भोईर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी राजेंद्र भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजेंद्र भोईर यांनी सांगितले की, "आपण अत्यंत गरिबीतून पुढे आलो आहोत, जीवनात शिक्षणच माणसाला तारुण नेईल, विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या संधीचं सोनं करावं, आपल्या आईवडिलांचे नाव उज्ज्वल करावे" असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पाटील यांनी केले. अनघा दळवी यांनी आभार प्रदर्शन केले.
1 Comments
How to Make Money from Betting on Sports Betting - Work
ReplyDelete(don't worry casino-roll.com if you get it wrong, though) The process involves placing bets on หารายได้เสริม different 1등 사이트 events, but poormansguidetocasinogambling it can also be done by using https://febcasino.com/review/merit-casino/ the