कल्याण : महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीतील ३३ अन्याय ग्रस्त जमातीच्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करून त्यांचे सेवानिवृत्त विषयक सर्व लाभ शासनाने रोखुनी धरल्याच्या विरोधात ऑफोह संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवत आपण अधिसंख्य पदाची अर्धी लढाई जिंकलो असा विश्वास व्यक्त करत अधिसंख्य पदाबाबत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेंशन लागू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण होईल असे प्रतिपादन ऑर्गानायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन च्या वतीने करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर ऑफोह संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर, कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते, ठाणे शाखा जिल्हा अध्यक्ष दयानंद कोळी, उपाध्यक्ष अर्जुन मेस्त्री, सह सचिव पांडुरंग नंदनवार, ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा स्मिता भोईर यांच्यासह राज्य महिला उपाध्यक्ष प्रिया रामटेककर, ठाणे 'ऑफ्रोह' चे मार्गदर्शन नरेश खापरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते जयेश तरे यांनी मोर्च्यास मार्गदर्शन केले.
ऑफोहचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर यांनी मोर्च्याला उपस्थित कर्मचा-यांना सांगितले की, ऑफ्रोह संघटनेचा उद्देश फक्त अधिसंख्य कर्मचाऱ्यांची नोकरी वाचवण्या इतका मर्यादित नाही तर संविधानाने आपल्या जमातीला दिलेले अधिकार प्राप्त करणे हा आहे. तसेच १८ लाख बोगस विद्यार्थी आश्रमशाळेत दाखवून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी लढा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी राज्याध्यक्ष सहारकर यांनी शेवटी स्पष्ट केले.
या मोर्चाला महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील आधिसंख्य पदावरील व सेवानिवृत्त कर्मचा-यांनी हजेरी लावली होती. ऑफोह संघटनेने आवाहन केल्याप्रमाणे महिला कर्मचा-यांची संख्याही उल्लेखनीय अशीच होती. ऑफोहच्या मोर्चास अन्यायग्रस्तांच्या विविध ४० संघटनांनी पाठिंबा जाहिर केल्याचे सहारकर यांनी सांगितले.
0 Comments