शिवछत्रपतींचा दिबा लघु चित्रपट प्रकाशित


कल्याण : शिवजयंतीच्या दिवशी  शिवछत्रपतींचा दिबा हा नविन लघु चित्रपट प्रकाशित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज सभाग्रुह निळजे येथे हा समारंभ संपन्न झाला. वसंतराव पाटील हे या प्रसंगी अध्यक्षस्थानी होते.


हा लघुचित्रपट वेगळ्या धर्तीचा आहे. यात येथिल भूमिपुत्रांचा इतिहास आहेसमाज भावना आहेत. लोकनेते दिबां पाटील यांचा विषय येतो. तरिही हा माहितीपट  नाही. एका विशिष्ट संकल्पनेच्या आधारे नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी जनजाग्रुती करण्याचा एक ध्यास दिसतो. विशेष म्हणजे हा लघुचित्रपट संपुर्णतहा येथिल भूमिपुत्रांनी निर्माण केलेला आहे.


याचे,लेखन, दिग्दर्शन, कलाकार, पर्श्वसंगीत, गीत, तांत्रिकबाजू, निर्मिती सर्व गोष्टी भूमिपुत्रांनी सांभाळलेल्या आहेत. या साठी कुणीही कसलेही मानधन स्विकारलेले नाही. समाजाप्रती असलेल्या प्रेमापोटी आणि लोकनेते दि.बा.पाटील यांच्यावर असलेल्या आदरभावनेने हा लघु चित्रपट निर्माण केला आहे. अनेक गावातील दूरदूरच्या भूमिपुत्रांचा यात सहभाग आहे.


या प्रसंगी लघुचित्रपटाचे लेखक मोरेश्वर पाटील, दिग्दर्शक दया नाईक, आगरी कोळी महासंघाचे अध्यक्ष एड.भारद्वाज चौधरी, धर्माभिमानी आगरी कोळी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र पाटील, संघर्ष समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, भालचंद्र पाटील, विजय गायकर, शिवचंद्र पाटील, रघूनाथ पाटील, संतोष भोईर, दिपक पाटील त्याच बरोबर लोकनेते दिबा पाटील यांचे कुटूंबीय देखिल उपस्थित होते. यावेळी सर्व कलावंत आणि या लघुचित्रपटासाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांना आयोजकां तर्फे सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments