युक्रेन मध्ये अडकलेल्या भिवंडीतील मुस्कान सोबत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी संवाद साधत दिला धीर..


भिवंडी दि 2 (प्रतिनिधी ) युक्रेन रशिया युद्धाचा सर्वाधिक फटका भारतातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना बसला आहे .युक्रेन मध्ये तब्बल 20 हजार विद्यार्थी युद्ध मुळे अडकून पडले असताना भारत सरकारने मिशन गंगा मोहीम राबवून भारतीय विद्यार्थ्यांना भारतात माघारी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.


          असताना केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या  भिवंडी लोकसभा मतदारसंघातील पडघा येथील मुस्कान सोबत संवाद साधून तिला धीर देत भारत सरकार सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप माघारी आणणार असून त्यासाठी धीर धरावा व तो पर्यंत स्वतःची काळजी घ्यावी असे कपिल पाटील यांनी मुस्कान सोबत मोबाईल व्हिडीओ संवादा दरम्यान सांगितले .


         केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मुस्कनाला फोन करून धीर दिल्याची महिती कुटुंबियांना कळताच कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केला आहे.सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद मुळे आपली मुस्कान सुखरूप परत घरी येईल असा विश्वास व्यक्त केला आहे...

Post a Comment

0 Comments