कल्याण डोंबिवली खाडीत अवैध रेती उपसा करणाऱ्यावर कारवाई चा बडगा खाडीत बोटीने पाठलाग करीत केली कारवाई रेती उपश्याचे साहित्य केले जप्त कारवाई सुरुच


कल्याण  :-  कल्याण खाडी क्षेत्रातील    दुर्गाडी रेतीबंदर डोंबिवली येथील मोठा गाव रेतीबंदर परिसर या दोन्ही ठिकाणी अवैध रेती उपसा सुरु होता. या दोन्ही ठिकाणी रात्रीच्या सुमारास ड्रेजर्स आणि बाजने रेती उपसा केला जात होता. शेकडो ब्रास काढण्यात आलेली रेती रातोरात्र हलविली जात होती. रेती उपसा करणारे  ड्रेजर्स, बाज, बोटी या खाडीच्या पाण्यात मध्यभागी ठेवल्या जात होत्या. त्यामुळे त्या कळून येत नव्हत्या. 


        त्याची माहिती कल्याणच्या तहसीलदारांना मिळताच त्यांनी कारवाई पथकासह धाड टाकत थेट खाडीत बोटीने पाहणी करीत असताना त्यांना याठिकाणी अवैध रेती उपसा आढळून आला. तहसीलदारांच्या कारवाई पथकाने रेती उपसा करणाऱ्या बोटीच्या दिशेने धाव घेतली. पथक उपसा करणाऱ्या च्या दिशेने येत असल्याचे पाहून बोटीवरील कामगारांनी प्रथम प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.


       मात्र पथकाचा आक्रमक पावित्र पाहून कामगारांनी खाडीच्या पाण्यात उड्या मारीत पळ काढला.  कारवाई पथकाने ६ रेती उपश्याचे पंप, दोन बाज, रेतीची आठ कुंड या पथकाने नष्ट केली आहे. कारवाई दरम्यान जप्त केलेली शेकडो ब्रास रेती पुन्हा खाडीत सोडण्यात आली आहे. यापूढेही कारवाईचा बडगा सुरु राहणार असून गस्त ठेवली जाणार आहे.                           
  

      अशी केली धडक कारवाई सोमवारी २८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता कल्याण गणेश घाट येथून बोटीने खाडी मध्ये दक्षता पथक क्रमांक २ आणि तलाठी सझा कल्याण यांचे समवेत कारवाई साठी सुरुवात केली. कारवाई दरम्यान ४ सक्शन पम्प पाण्यामध्ये बुडविण्यात आले, आणि २ सक्शन पंप निवासी नायब तहसीलदार कल्याण आणि मंडळ अधिकारी ठाकुर्ली आणि त्यांच तलाठी यांनी कटर आणून कटर च्या साहाय्याने कट करून कोपर खाडीत पाण्यामध्ये बुडाविण्यात आले आहेत .


       तसेच २ बार्ज पाण्यामध्ये बुडविण्यात आल्या, तिसरी बार्ज ओहोटी असल्यामुळे जमिनीला लागली होती त्यामुळे खेचता आली नाही.अशाप्रकारे अंदाजे किंमत १२ लाखाची बार्ज  आणि सक्शन पम्प रक्कम अंदाजे तीन लाख प्रमाणे १८ लाखाचे माल नष्ट करण्यात आला.

Post a Comment

0 Comments