खर्डी महाविद्यालयात व्यसनमुक्ती विषयावर मार्गदर्शन


कल्याण : जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खर्डी दळखण येथील राष्ट्रीय सेवा योजना व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने "व्यसनमुक्ती " या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सलाम मुंबई फाउंडेशनचे प्रतिनिधी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील  यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


मिलिंद पाटील यांनी मार्गदर्शनात व्यसनांमुळे माणसास शारीरिकमानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते ( दारूगुटखातंबाखूसेगरटअमली पदार्थ) चे सेवन व त्यांचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. तंबाखू च्या सेवनाच्या चक्र व्यूहातून तरूण पिढीला बाहेर काढूननिकोटीन व तंबाखू च्या व्यसनापासून प्रतिबंध करणे. ही या वर्षी ची जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य संकल्पना आहे.


            देशात प्रत्येक १६ सेकंदाला एक मूल तंबाखूचे पहिल्यांदा सेवन करतो तर दर दिवशी हा आकडा ५,५००  मुलांपर्यंत जातो. या व्यसनाच्या दुष्टचक्र यापासून अलिप्त ठेवण्यासाठी प्रत्येक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी मानसिकता निर्माण करणे,  तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचा समाजावर मोठा परिणाम होत आहे. अनेकांना कर्करोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.  विद्यार्थ्यांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत आहे.


यावेळी कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी पोस्टरव्हीडिओव्दारे जनजागृती करून व्यसनमुक्तीचे आवाहन केले. याप्रसंगी जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदेकलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खर्डीचे प्राचार्य प्रा. कळकटेराष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अपर्णा जाधवप्रा. प्रियांका पवारइतर प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे ७५  स्वयंसेवक सहभागी झाले. प्रा.अपर्णा जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले व व्यसनमुक्तीची शपथ घेऊन कार्यक्रमाने समारोप झाला. विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments