रिपब्लिकन पक्षाच्या राजस्थान प्रभारी पदी नितीन कुमार शर्मा यांची अधिकृत नियुक्ती - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले


मुंबई दि. 4 - रिपब्लिकन पक्षाच्या राज्यस्थान प्रभारी पदी नितीनकुमार शर्मा यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे. मुंबईत बांद्रा येथील कार्यालयात ना.रामदास आठवले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ  देऊन नितीन कुमार शर्मा यांना रिपाइं चे अधिकृत राजस्थान प्रभारी घोषित केले.


        ऍड.नितीनकुमार शर्मा हे उच्चशिक्षित   तरुण सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना राजस्थान च्या  सामाजिक; शैक्षणिक  आणि  सांस्कृतिक क्षेत्राचा दीर्घ अनुभव आहे. ते स्वतः उद्योजक  आणि विधिज्ञ आहेत. मुंबईत स्थायिक झालेल्या राजस्थानी व्यावसायिकांना संघटित करून त्यांचे आणि राजस्थान मधील गावकऱ्यांचे प्रश्न सोडवीण्यात ऍड.नितीन कुमार शर्मा यांचा नेहमी पुढाकार राहिला आहे.


           राजस्थान मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार आणि रिपब्लिकन पक्षाची चळवळ मजबूत करण्यात ऍड. नितीन कुमार शर्मा निश्चित यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त करून ना.रामदास आठवले यांनी त्यांच्यावर रिपब्लिकन पक्षाच्या राजस्थान प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे.त्याबद्दल ऍड.नितीमकुमार शर्मा यांनी केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचे आभार मानले आहेत.


         रिपाइंचे राजस्थान प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल ऍड.नितीमकुमार शर्मा यांचे फ्लोरा फाउंडेशन चे ट्रस्टी अरुण सबनीस; तसेच आनंद जैन; आजाद खान; ऍड. राजेश बोथरा; भवानी नंदवना;  मनोज मोहपात्रा ; आदी अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments