साईबाबा पिसवली संघाने पटकावला जीएम चषक लोकसेवा मित्र मंडळाचे आयोजन


कल्याण : लोकसेवा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित जीएम चषक साईबाबा पिसवली संघाने पटकावला तर जय इलेव्हन हा संघ उपविजयी ठरला. या विजेत्यांना समाजसेवक उमेश शेट्टी, दीपक मिश्रा, रवी जाधव, सबर मामा, संतोष मढवी आदी मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आले.


       कै. जॉर्ज अँथॉनी व कै. महेश शेट्टी यांच्या स्मरणार्थ लोकसेवा मित्र मंडळातर्फे भव्य डे अंडर आर्म बॉक्स क्रिकेटच्या दोन दिवसीय सामन्यांचे आयोजन कल्याण पूर्वेतील लोकसेवा नगर, चक्कीनाका याठिकाणी करण्यात आले होते. दोन दिवसांच्या या सामन्यांमध्ये एकूण १६ संघ सहभागी झाले होते. 


        यापैकी साईबाबा पिसवली आणि जय इलेव्हन यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात साईबाबा पिसवली संघाने २९ धावांचे लक्ष जय इलेव्हन संघापुढे ठेवले. मात्र या संघाला अवघ्या १९ धावांवरच रोखत साईबाबा संघाने विजय मिळवला. विजय संघाला २१ हजार रोख रक्कम आणि भव्य चषक तर उपविजयी संघाला ११ हजार रोख रक्कम आणि भव्य चषक देऊन गौरविण्यात आले.


       या सामन्यांत गणेश जाधव हा सामनावीर, सर्वोत्तम फलंदाज निलेश पांचाळ, सर्वोत्तम गोलंदाज साई पाल, सर्वोत्तम क्षेत्र रक्षण नितेश वर्मा, तर गणेश जाधव हा खेळाडू मालिका वीर ठरला. या सर्व विजेत्यांना चषक आणि टीशर्ट देण्यात आला.   

Post a Comment

0 Comments