आर्टपार्कने केली इनोव्हेशन समिट २०२२ ची घोषणा

■५जी, एआय आणि रोबोटिक्सच्या भूमिकेवर टाकणार प्रकाशझोत ~


मुंबई, ११ मार्च २०२२ : भारतामध्ये एआय व रोबोटिक्स क्षेत्रातील नवसंकल्पनांवर आधारित, जागतिक स्तरावर अग्रेसर ठरू शकेल अशी परिसंस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत बेंगळुरू स्थित ना-नफा तत्त्वावर चालणा-या एआय अँड रोबोटिक्स टेक्नोलॉजी पार्क (आर्टपार्क)ने इनोव्हेशन समिट २०२२ची घोषणा केली आहे. 


      हायब्रिड मॉडेलनुसार आयोजित करण्यात आलेली ही एकदिवसीय शिखर परिषद १४ मार्च २०२२ रोजी, बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) येथे सकाळी ११ ते संध्याकाळी ५.३० या वेळेत पार पडणार आहे. शिखरपरिषदेच्या या पहिल्याच पर्वामध्ये 'कनेक्टिंग द अनकनेक्टेड' या विषयसूत्राला पुढे नेण्यात येणार असून विकासाच्या दिशेने होणा-या वाटचालीत कुणीही मागे राहून जाऊ नये याची काळजी घेण्यासाठी स्मार्ट, शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्था उभारणे हा या विषयसूत्राच्या निवडीमागील हेतू आहे.


      या शिखरपरिषदेला डॉ. राजीव कुमार, (व्हाइस चेअरमन, निती आयोग), डॉ. अश्वथ नारायण सी.एन., माननीय मंत्री (आयटी, बीटी, एसटी, उच्चशिक्षण), डॉ. एस. चंद्रशेखर (सचिव, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार), प्रशांत प्रकाश (एक्सेल ग्रुप), श्री राम सेवक शर्मा (सीईओ, एनएचए, माजी अध्यक्ष, टीआरएआय), अभिषेक सिंग (सीईओ, MyGov), प्रा. रंगराजन (संचालक, आयआयएससी), डॉ. चिंतन वैष्णव (मिशन डिरेक्टर, अटल इनोव्हेशन मिशन) इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी उद्योग, शैक्षणिक क्षेत्र आणि सरकारमध्ये कार्यरत असलेली आणि नवसंकल्पनांचा हिरीरीने पुरस्कार करणारी समविचारी ही सर्व मंडळी भारताला भविष्यलक्ष्यी तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या महत्त्वाविषयी आपल्या विचारांची देवाणघेवाण करतील.


      तंत्रज्ञानाच्या आघाडीवर मोठी झेप, आजवर तंत्रज्ञानाशी जोडल्या न गेलेल्या समाजगटांना या प्रवाहात सामावून घेणे, भारताच्या आरोग्यक्षेत्रासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर, भारताला ड्रोन्सनी जोडणे, भविष्यासाठी सर्वांना सामावून घेणारे शिक्षण आणि भारताला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडण्याच्या कामी आधार आणि कोविनपासून मिळालेले धडे आदी विषयांवर परिषदेत चर्चा करण्यात येईल.


     याखेरीज डॉ. अश्वथ नारायण, डॉ. राजीव कुमार, श्री. राम सेवक शर्मा (सीईओ, एनएचए, माजी अध्यक्ष टीआरएआय) आणि श्री. उमाकांत सोनी, सीईओ, आर्टपार्क यांची प्रमुख भाषणे यावेळी होतील. यावेळी लेगेड रोबोट्स, मल्टी-टेरेन टेलीऑपरेटेड UGV's, ARTPARK आणि आयआयएससीने इतर स्टार्टअप्सच्या साथीने विकसित केलेल्या प्रगत एअर मोबिलिटी उपाययोजना, यांची थेट प्रात्यक्षिकेही उपस्थितांसमोर प्रस्तुत केली जातील.


 ही परिषद ऑनलाइन पाहण्यासाठी लोकांना https://www.artpark.in/events या लिंकवर नावनोंदणी करता येईल.

Post a Comment

0 Comments