कल्याण : नांदीवली टेकडी परिसरातील पाणी टंचाईच्या समस्येचे महापालिकेकडून निराकारण केल्याने उच्च न्यायालयाने महापालिकेची प्रशंसा केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावातील नांदीवली टेकडी या उंचावर असलेल्या परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने या भागातील नागरिकांनी मा.उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली होती, त्या अनुषंगाने उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान या समस्येवर कायम स्वरुपी उपाय योजना करण्याची सुचना न्यायालयाने दिली होती.
त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व एम.आय. डी .सी .चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अनाबलागन यांच्यात या विषयाबाबत बैठक संपन्न होवून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशानुसार पाणी पुरवठा विभागाचे डोंबिवलीतील कार्यकांरी अभियंता किरण वाघमारे यांच्या पथकाने युध्द पातळीवर काम करुन अंदाजे १२०० मी. लांबीची २०० मी .मी. व्यासाची नवीन वितरणवाहीनी एमआयडीसी टॅपिंग पॉईंट ते पिंपळेश्वर मंदिर संप पर्यंत टाकून व संप मध्ये ६० एच.पी चा सबमर्सिऺबल पंप बसवून पाणी पुरवठा सुरळीत चालू केला.
या कामामुळे नांदिवली टेकडी परिसरातील पाणी टंचाई दूर झालेली असून हे काम महापालिकेने अवघ्या ७ दिवसांत पुर्ण केले आहे. महापालिकेने तातडीने केलेल्या कामाची दखल मा. उच्च न्यायालयाने घेऊन याबाबत महापालिकेची प्रशंसा केली आहे.
0 Comments