एसटी डेपोला रिक्षाचालकांचा विळखा अपप्रवृत्ती रिक्षा चालकांच्या उपद्रवी हरकतीनी प्रवासी नागरीक हैराण


कल्याण : कल्याणच्या एसटी डेपोला रिक्षाचालकांचा विळखा पडला असून  एसटी बस स्टॅण्ड व बस स्टॅण्ड समोरील मुख्य रस्त्यावर अपप्रवृत्ती गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांनी कब्जा केला आहे. या अपप्रवृत्ती रिक्षा चालकांच्या उपद्रवी हरकतींनी प्रवासी नागरीक हैराण झाले आहेत. या अपप्रवृत्ती रिक्षा चालकांकडुन नित्यरोज प्रवाशांच्या मोबाईल मौल्यवान चिज वस्तू पैसै चोरीमारी लुटमारीच्या  घटना वाढत आहेत. याकडे पोलीस, वाहतुक पोलीस आणि आरटीओ प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.


एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला नसल्याने एसटी बस सेवा अत्यंत संथगतीने सुरु आहे. एसटी बस सेवा मोठ्या प्रमाणात बंद असल्याने केडीएमटी व एनएमएमटी कल्याण व नवीमुबंई महापालिका परिवहन उपक्रमाच्या बस सेवेचं संचलन कल्याण बस आगारातुन होत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय काही प्रमाणात टळत आहे. पंरतु एसटी बस बंद असल्याचा फायदा घेऊन शेकडो अपप्रवृत्ती विना लायसन्स बॅच, विना परवाना रिक्षा व रिक्षा चालंकानी एसटी बस स्थानकावर व समोरील मुख्य वाहतुकीचा रस्ता कब्जा केलेला आहे.


अपप्रवृत्ती विना लायसन्स बॅच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षा चालकांकडुन केडीएमटी, एनएमएमटी बस संचलन अडथळा निर्माण केला जात आहे. महापालिका परिवहन बस सेवा उपक्रमातील चालक, वाहक कर्मचारी यांना शिविगाळ दमदाटी करण्याची मजल देखील या अपप्रवृत्ती रिक्षा चालकांची पोहोचली आहे. त्यामुळे अशा या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिक प्रवासी करीत आहे.

Post a Comment

0 Comments