भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) बापाने मुलीच्या लग्नास नकार दिल्याच्या वादातून तरुणाने बापाला बहाण्याने नेऊन त्याची चाकूने गळयावर वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना भिवंडी - वाडा राज्यमार्गावरील कवाड गावाच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पप्पूकुमार रामकिशोर शाह (वय २६) असे आरोपी तरुणाचे नाव असून तो मूळचा बिहार राज्यातील रहिवासी आहे. तर कमलजीत सांडे (वय ५२) असे हत्या झालेल्या बापाचे नाव आहे.
■डोक्यात लग्नाचे भूत शिरल्याने काढला काटा ..
मृतक कमलजित कुटंबासह उल्हासनगर कॅम्प नंबर ५ परिसरात राहत होते . तर त्याच शेजारी आरोपी पप्पू गेली ५ वर्षापासून राहत असल्याने दोघांमध्ये ओळख होती. त्यामुळे आरोपीचे मृतकच्या घरी जेणे होते. त्यातच काही महिन्यापूर्वी आरोपीने मृतकच्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी मागणी केली. मात्र यामधून दोघांमध्ये भाडणं होऊन मृतकने आरोपीला मारहाण केली होती. त्यानंतर आरोपीने मृतकाला माफी मागत पुन्हा बोलचाल सुरु केली. मात्र आरोपीच्या डोक्यात लग्नाचे भूत शिरल्याने आरोपी पप्पूने कमलजीतचा काटा काढण्याचे ठरवले होते.
त्यानुसार ४ मार्च रोजी पार्टीच्या बहाण्याने कल्याणहुन भिवंडीला बसमध्ये नेले. त्यानंतर आनगावला जाणाऱ्या एका खाजगी वाहनात बसले. मात्र मध्येच कवाड गावाच्या हद्दीत उतरून एका कंपाऊंड असलेल्या मोकळ्या जागेत बसून दोघांनी दारूची पार्टी केली. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा लग्नाच्या मागणीवरून वाद झाला त्यावेळी आरोपीने कमलजितच्या गळ्यावर चाकूने वार करून घटनास्थळावरून तो पुन्हा उल्हासनगरात आला होता.
■गुन्हा करून आरोपी पळाला बिहारला
दुसरीकडे वडील घरी आले नाही म्हणून मृतकच्या मुलीने वडिलांच्या मोबाईलवर संपर्क केला असता रिंग वाजली त्यानंतर मोबाईल बंद येत होता. त्यामुळे मुलीने आरोपीकडे वडीलाची चौकशी केली तर त्याने वडील उशिरा घरी येथील म्हणून सांगितले. मात्र दोन दिवस उलटूनही वडील घरी आले नाही. म्हणून पुन्हा आरोपी पप्पूला मुलीने जाब विचारला असता तुझे वडील आता कधीच घरी येणार नाही असे बोलून निघून गेला.
तर कमलजितच्या पत्नीने स्थानिक हिललाईन पोलीस ठाण्यात जाऊन पती 4 मार्चला आरोपी पप्पू सोबत गेला मात्र अजूनही परत नाही असे सांगताच पोलीस त्याच्या घरी गेली होती. त्यानंतर त्याला कळून चुकले कि पोलीस आपल्या अटक करतील त्यामुळे 9 मार्चला पहाटेच्या सुमारास आपल्या आई घेऊन आरोपी मूळ गावी बिहारला पळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.
१९ मार्चपर्यत पोलीस कोठडी ....
भिवंडी तालुक्यातील कवाड गावातील एका कंपाऊंडमध्ये 9 मार्च रोजी कमलजितचा मृतदेह पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत मृतकाची ओळख पटवून हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला असता 13 मार्च रोजी भिवंडी ग्रामीण पोलिसांचे एक पथक बिहार राज्यातील पिप्राखेर गावात पोहचुन आरोपी पप्पूला पाहटेच्या सुमारास ताब्यात घेऊन अटक करून त्याला भिवंडीत आणले.
आज (सोमवार ) आरोपी पप्पूला न्यायालयात हजर केले असता १९ मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन दाभाडे करीत आहेत.
0 Comments