विरार कराटे स्पर्धेत कल्याण खेळाडूंचा बोल बाला राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडूंनी पटकावली ६९ पदके


कल्याण : विरार येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कल्याणच्या  खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत कुमितेकाता आणि स्पायरिंग या प्रकारात ६९ पदके पटकावली. ही स्पर्धा मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अँकॅडमी इंडिया च्या वतीने आयोजित करण्यात आली होती.


या स्पर्धेत ठाणे, मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग येथील ५०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सर्व विजते खेळाडूंना हनुमान गायकवाड,  जयेंद्र म्हात्रे व सेंसाई महेश चिखलकर यांचे मार्गदर्शन लाभले. या विजेत्या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. कुमिते प्रकारात चेतना साळुंकेसिद्धी काकडद्विती थळेनिखिल भास्टेआयुष अडेकरमंजिरी कुतरवाडेगौरवी तारी यांनी सुवर्ण पदक पटकावले. वैष्णवी काकडसुमित गुप्ताअंजली गुप्ता,लक्ष्मी गुप्ताहर्षाली पाटीलहिमांशु खंडारेस्वरा जाधव यांनी रजत पदक तर कृष्णा गुप्तासमर्थ कुरकुटेप्रतीक नायककनिष्का म्हात्रेश्रुती मोरे या खेळाडूंनी कांस्य पदक मिळविले.


 काता प्रकारात अर्चित पाटीलश्रुती मोरेगौरवी तारीआराध्य पाताडेआरव बोरेकरलक्ष्मी गुप्ताप्रतीक नायकदैविक फडणीसकुशल पुजारीअर्णव जाधवसिद्धी काकडवैष्णवी काकड हे खेळाडू सुवर्ण पदक विजेते ठरले. तन्वेश रायतेकनिष्का म्हात्रेधनश्री जोगळेओम कांबळेमंजिरी कुतरवाडेसुजल जाधवआयुष अडेकरनिखिल भास्टेनिरज बोरोलेदिया जैस्वालव्दिती थळेगायत्री कुरकुटेअंजली गुप्ताचेतना साळुंकेप्रथमेश आव्हाड यांनी रजत पदक तर आशिष साहेजरावरुजल सानपसुमेध गायकवाडदर्श गायकवाडरणविर म्हात्रेसुमित गुप्ताश्राव्या सांगळेगणेश दिवटेआरूष सांगळेअस्मी पाटकर,  स्वरा जाधवआरोही मोरेआदिक मोरेहिमांशु खंडारेहर्षाली पाटीलनैतिक राऊतप्रांजल कुतरवाडेवेदिका गुप्तागितेश शिंदेहिमांशु गुप्तासमर्थ कुरकुटेरुद्र चासकरश्रुती मतेकृष्णा गुप्ता या खेळाडूंनी कांस्य पदक पटकावले.

Post a Comment

0 Comments