भाईंदरच्या जंजिरे धारावी किल्ल्याच्या संवर्धनासाठी एकूण १३ कोटीचा निधी उपलब्ध.... खासदार राजन विचारे


ठाणे, प्रतिनिधी : -  खासदार राजन विचारे यांनी भाईंदर पश्‍चिमेकडील उत्तन किनारपट्टीवरील चौक धारावी जंजिरे किल्ल्याची पाहणी नुकताच खासदार राजन विचारे यांनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त व स्थानिक आमदार गीता जैन यांच्यासोबत केली.


        तत्पूर्वी खासदार राजन विचारे व आमदार गीता जैन यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांची भेट घेऊन पत्राद्वारे किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती.


       या मागणीच्या अनुषंगाने पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांनी सन २०२१-२२ च्या प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत १० कोटी निधीची मागणी मान्य केली आहे. त्याचबरोबर या किल्ल्याच्या संवर्धनासाठी नुकताच मिरा-भाईंदर महापालिकेच्या आर्थिक बजेटमध्ये महानगरपालिकेने ३ कोटीची तरतूद केलेली आहे. त्यामुळे समुद्राला लागून असणाऱ्या या किल्ल्याच्या संवर्धनासाठी एकूण १३ कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. 


       त्यामुळे भाईंदर पश्चिमेकडील धारावी जंजिरे किल्ला हा पर्यटकांचा केंद्रबिंदू ठरणार आहे असे खासदार राजन विचारे यांनी म्हटले आहे. नुकताच १६ मार्च २०२२ रोजी ठाणे जिल्हा नियोजन अधिकारी यांनी मीरा भाईंदर महापालिकेस प्रस्ताव सादर करण्याचे पत्र सादर केले आहे. त्याप्रमाणे महानगरपालिकेने नियोजित आराखडा बनविण्याचे काम सुरु करण्यात आलेले आहे.


        लवकरच प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व आदित्यजी ठाकरे साहेब त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments