क्रिसलिसने क्लास रूम्सना बनविले थिंकरूम्स

■२० वर्षे केली पूर्ण; २० राज्यांमधील १८०० पेक्षा जास्त शाळांमध्ये केले परिवर्तन ~


मुंबई, २२ मार्च २०२२ : क्रिसलिस या शैक्षणिक संशोधन आणि नावीन्यपूर्णता क्षेत्रातील भारतातील आघाडीच्या संघटनेने देशभरातील १८०० पेक्षा जास्त शाळांमध्ये व जवळपास १० लाख विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय परिवर्तन घडवून आणल्याची घोषणा केली आहे. सुरुवातीपासूनच या संघटनेने शिक्षण आणि अध्यापनशास्त्रामध्ये केलेले सातत्यपूर्ण संशोधन या परिवर्तनाचा पाया आहे. चेन्नईमध्ये मुख्यालय असलेली ही शिक्षण तंत्रज्ञान कंपनी देशभरातील २० राज्यांमध्ये कार्यरत आहे.


    क्रिसलिसची सुरुवात २००१ साली झाली. पाच सदस्यांपासून सुरु झालेल्या या संघटनेमध्ये आज २०० पेक्षा जास्त क्रिसलियन्स आहेत. या क्षेत्रामध्ये काम करण्याच्या गेल्या २० वर्षांच्या अनुभवांच्या आणि नैपुण्यांच्या आधारे क्रिसलिस शिशुपासून आठवीपर्यंतचे वर्ग असणाऱ्या संस्थांना संशोधन व अभ्यासक्रम रचनेमार्फत डिजिटल पायाभूत सुविधा प्रदान करून आपल्या सेवा पुरवते. क्रिसलिसचा मिश्रित शिक्षण कार्यक्रम मुलांमध्ये शिक्षणामुळे घडून येणाऱ्या परिणामांबाबत अंतर्दृष्टी पुरवतो. हा दृष्टिकोन मुलांना सर्वसमावेशक शिक्षण पुरवतो आणि शिक्षकांच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा घडवून आणतो.


        थिंकरूम हे आपले प्रमुख उत्पादन क्रिसलिसने २०१२ साली सुरु केले. मुलांना केंद्रबिंदू मानून तयार करण्यात आलेला हा शैक्षणिक कार्यक्रम मानवी क्षमता संरचनेवर आधारित आहे. अध्यापनशास्त्रामध्ये एक दशकाहून अधिक काळ केलेल्या गहन संशोधनानंतर सुरु करण्यात आलेल्या 'एज्युकेशन फॉर ह्युमन पोटेन्शियल' या आंदोलनामार्फत थिंकरूमची सुरुवात करण्यात आली. आकलन, भावनात्मक, सामाजिक आणि स्वतःच्या मानसिक प्रक्रियांबद्दल विचार करण्याची क्षमता हे चार घटक मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी चार घटक महत्त्वाचे असतात, त्यांना उद्देशून काम करणे हा कार्यक्रमाचा हेतू आहे.


      क्रिसलिसच्या सीईओ व संस्थापक चित्रा रवी यांनी सांगितले, "मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये आम्ही लागू केलेल्या विकसनशील उपाययोजनांमध्ये आम्ही 'मुलांना प्रथम प्राधान्य' या आमच्या धोरणावर लक्ष केंद्रित केले आहे. थिंकरूम आणि मिश्रित शिक्षण सुरु केल्यापासून आम्ही बराच मोठा पल्ला गाठला आहे. मी असे मानते की आमच्या क्रिसिलियन्सच्या अतिशय उत्साही व निपुण टीमने ही वाटचाल सुरळीतपणे पार पाडण्यात लक्षणीय योगदान दिले आहे. 


     मुलाच्या जीवनातील पायाभूत वर्षांमध्ये विकसनशील परिवर्तन आम्ही घडवून आणू शकतो आणि आता शिक्षक हे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील माहिती शिकवत नाहीत ही जाणीव आमच्यासाठी प्रेरणादायी ठरते.

Post a Comment

0 Comments