कल्याणात सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरवर जीवघेणा हल्ला..डोंबिवली ( शंकर जाधव )  सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरवर भरदिवसा अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कल्याण येथील खडेगोळवली परिसरात घडली.या हल्ल्यात  कॉन्ट्रॅक्टरवर जबर जखमी झाला असून त्याच्यावर पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात   उपचार सुरू आहे.या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात  हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
   

             मिळालेल्या माहितीनुसार, विपीन मिश्रा असे या हल्ल्यात जखमी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचे नाव आहे.हल्लेखोर एका मोटरसायकलवरून आले होते.खडेगोळवली येथील पाण्याच्या टाकीजवळ हल्लेखोरांनी मिश्रा यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने वार करून हल्लेखोर मोटरसायकलीवरून पसार झाले.हल्ल्यात मिश्रा रक्तबंबाळ झाले होते.त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.पोलीस हल्लेखरांचा शोध घेत आहे.

Post a Comment

0 Comments