सारा अली खान यांनी दि सोल्‍ड स्‍टोअरमध्‍ये केली गुंतवणूक

■लोकप्रिय अभिनेत्री बनल्‍या गुंतवणूकदार आणि स्‍वदेशी व्‍यापारी व फॅशन लेबलमध्‍ये केली अघोषित रक्‍कमेची गुंतवणूक 


मुंबई , ११ मार्च २०२२: दि सोल्‍ड स्‍टोअर हा भारतातील सर्वात लोकप्रिय कॅज्‍युअलवेअर व पॉप-कल्‍चर अॅपरल ब्रॅण्‍ड सारा अली खान यांचे इक्विटी पार्टनर म्‍हणून स्‍वागत करण्‍यास सज्‍ज आहे. उदयोन्‍मुख न्‍यू-जनरेशन अभिनेत्रीने ब्रॅण्‍डमध्‍ये अघोषित रक्‍कमेची गुंतवणूक केली आहे, ज्‍यामुळे दि सोल्‍ड स्‍टोअरला लक्षणीय गुंतवणूक मिळण्‍यासोबत ब्रॅण्‍डच्‍या सेलिब्रिटी स्‍टार पॉवरला चालना मिळाली आहे.


        दि सोल्‍ड स्‍टोअरची व्‍यापक लोकप्रियता, वाढती ब्रॅण्‍ड इक्विटी आणि सारा यांचे पॉप कल्‍चरप्रती प्रेम पाहता हा सहयोग निश्चितच लाभदायी ठरेल. चार पॉप कल्‍चर उत्‍साही वेदांग पटेल, हर्ष लाल, आदित्‍य शर्मा व रोहिन सामटने यांनी स्‍थापना केलेले दि सोल्‍ड स्‍टोअर हे भारताचे सर्वात मोठे ऑनलाइन मर्चंडायझिंग व्‍यासपीठ असून त्‍याच्‍या आश्रयांतर्गत डिस्नी, वॉनर्र ब्रदर्स, डब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यूई, आयपीएल, व्‍हायकॉम१८ सारखे परवाने आहेत.


        स्‍थापनेपासून दि सोल्‍ड स्‍टोअर दरवर्षाला नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करत आले आहे. नुकतेच एलीव्‍हेशन कॅपिटलकडून ७५ कोटी रूपयांचा मल्‍टी-कोअर निधी संपादित केला आहे, ज्‍यामधून इतर डी२सी ब्रॅण्‍ड्सना मोठे स्‍वप्‍न पाहण्‍यास चालना देखील मिळाली आहे. ब्रॅण्‍डने विविध मोहिमा देखील सुरू केल्‍या आहेत , ज्‍यामध्‍ये ओटीटी व यूट्यूब सुपरस्‍टार्स आशिष चंचलानी, मिथिला पालकर (लिटल थिंग्‍स), आयुष मिश्रा (कॉल माय एजंट: बॉलिवुड), बरखा सिंग (इं‍जीनिअरिंग गर्ल्‍स एस२), एहसास चन्‍ना (गर्ल्‍स हॉस्‍टेल) यांचा समावेश आहे.


       या सहयोगाबाबत बोलताना सारा अली खान म्‍हणाल्‍या, ''मला दि सोल्‍ड स्‍टोअरसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. अल्‍पावधीतच ब्रॅण्‍डने कॅज्‍युअल वेअर क्षेत्रामध्‍ये स्‍वत:चे नावलौकिक केले आहे. मूळत: निस्‍सीम पॉप-कल्‍चर प्रेमी व निस्‍सीम विश्वसक असण्‍यासोबत आरामदायीपणा फॅशनइतकाच महत्त्वाचा  असल्‍याने मी ब्रॅण्‍डकडे गुंतवणूकीसाठी परिपूर्ण म्‍हणून पाहते. मी टीएसएस समूहाचा भाग होण्‍यास उत्‍सुक आहे.''


       सारा अली खान यांच्‍या नियुक्‍तीबाबत बोलताना दि सोल्‍ड स्‍टोअरचे सह-संस्‍थापक रोहिन सामटने म्‍हणाले, ''आम्‍हाला सारा यांचे स्वागत करताना आनंद होत आहे. त्‍यांनी फॅशन व स्‍टायलिंगप्रती त्‍यांच्‍या प्रेमासंदर्भात निश्चितच स्‍तर उंचावला आहे. त्‍यांची विलक्षण व प्रयोगात्‍मक स्‍टायलिंग आमच्‍या ब्रॅण्‍ड प्रतिमेला सादर करते. आम्‍हाला त्‍यांचासारखा सर्वोत्तम गुंतवणूकदार व सहयोगी म्‍हणून दुसरे कोणी मिळू शकत नाही. आम्‍ही अपेक्षा करतो की, हा सहयोग एकत्रितपणे उत्तम यशस्‍वी ठरेल.'' 

Post a Comment

0 Comments