कल्याण : डोंबिवली एमआयडीसी सर्व्हिस रोड वरील मोनार्च सोसायटी आणि वंदेमातरम् उद्यान जवळ मोठ्या प्रमाणात कचरा व झाडांचा पालापाचोळा पडलेला होता. आज शुक्रवारी सकाळी सव्वा आठ वाजता तेथील कचऱ्याला मोठी आग लागली होती. आग लागलेल्या जागेखालून उच्च दाब पेट्रोलियम उत्पादन पाईपलाईन, मुंबई - मनमाड पाईपलाईन जात असून तसा चेतावणी बोर्ड लावण्यात आला आहे. तसेच या जागे वरून हाय टेन्शन वायर जात आहे. सुदैवाने येथील काही नागरिकांनी मिळून पाणी टाकून आग विझविण्यात यश मिळविले. या आगीमुळे जवळच्या झाडांना फटका बसला आहे.
या ठिकाणी नागरिक कचरा आणि पालापाचोळा, नारळाचा झाडाचा झावळ्या इत्यादी मोठ्या प्रमाणात टाकत असतात. केडीएमसी पण याकडे गांभीर्याने पाहत नाही. जर या आगीमुळे जमिनीखालील पाइपलाइन पर्यंत आग धुमसून गरम होऊन काही ठींगणी लागली तर मोठी दुर्घटना झाली असती. याला येथे कचरा टाकणारे बेजबाबदार नागरिक, केडीएमसी, एमआयडीसी हे जबाबदार राहतील. यापुढे केडीएमसीने अशा कचरा टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजु नलावडे यांनी केली आहे.
0 Comments