गडकिल्ले महाराष्ट्राची रत्ने.... गडकिल्यांचे संवर्धन प्रत्येकाची जबाबदारी.. दुर्गप्रेमी प्रशांत वाघरेंचे आवाहन


डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धन, दुरुस्ती आणि सुरक्षा हि फक्त सरकारची जबाबदारी नसून राज्यातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.आजही अनेक किल्ले असे आहे कि त्यांची माहिती नागरिकांनी नाही.अश्या वेळी आम्ही दुर्गप्रेमींनी एकत्र येऊन दुर्गवीर प्रतिष्ठानची स्थापन केली.गड-किल्ल्यांवर येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना यांची माहिती दिली जाते.या किल्ल्यांवरील स्वच्छता आणि दुरुस्ती केली जात असल्याने आज किल्ले पाहण्यासाठी हजारोची गर्दी होत असते. गडकिल्ले महाराष्ट्राची रत्ने.... गडकिल्यांचे संवर्धन प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे दुर्गप्रेमी प्रशांत वाघरे यांनी डोंबिवलीत गडदुर्ग छायाचित्र प्रदर्शन व शस्त्र प्रदर्शनात विद्यार्थी आणि नागरिकांना आवाहन केले.

 

         छत्रपती शिवाजी महाराज जयंती ( तिथीप्रमाणे ) डोंबिवली पश्चिमेकडील देवी चौकात माजी नगरसेवक  रणजीत जोशी आणि वृषाली जोशी यांच्या पुढाकाराने दुर्गवीर प्रतिष्ठानने गडदुर्ग छायाचित्र प्रदर्शन व शस्त्र प्रदर्शन भरविले होते.गडकिल्यांची परिस्थिती , तेथील स्वच्छता याबाबत माहिती देणारे १५० छायाचित्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धात वापरण्यात आलेल्या  तलवारी, कडकित्ते, कुल्हाड आणि शस्त्र प्रदर्शनात दाखविल्यात आले.यावेळी प्रतिष्ठानचे प्रशांत वाघेरे यांनी विद्यार्थी आणि नागरिकांनी किल्ल्यांबाबत माहिती दिली.कोल्हापूर येथील `सामानगड`बाबत फारसी कोणाला माहिती नव्हती. दुर्गवीर प्रतिष्ठानने या किल्याची स्वच्छता,शकत तिकडे दुरुस्ती केल्याने आज हा किल्ला पाहण्यासाठी हजारो नागरीक येत असतात.

  

       माजी नगरसेविका वृषाली जोशी म्हणाल्या, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकाला गड-किल्यांची माहिती असली पाहिजे.विद्यार्थ्यांना प्रदर्शनाच्या मध्यामानातुन किल्यांची माहिती मिळावी जेणेकरून किल्याचे महत्व त्यांना समजले पाहिजेत या यामागचा उद्देश असल्याचे जोशी यांनी सांगितले. लेझीम, ढोल-तश्या पथक, महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा कणा व अ वैचारिक प्रग्तीशिलतेचा वारसा जगणारे नाटक `लोक –शास्त्र सावित्री` तसेच तुतारी वादक पांडुरंग गुरव हे प्रमुख आकर्षक असल्याची माहिती माजी नगरसेवक रणजीत जोशी यांनी दिली.

 

चौकट

 

      किल्यांची अवस्था डोंगर झाल्यासारखी अवस्था झाली होती.पावसाळ्यात या वास्तूची तर अवस्था फारच बिकट दिसत होती. दुर्गप्रेमीनी एकत्र दुर्गवीर प्रतिष्ठान गेली २० वर्षापासून किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे काम करत आहोत.फक्त सरकारची हि जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असल्याचे प्रतिष्ठानचे प्रशांत वाघरे यांनी संगितले.


       गडावर जाताना कुठेही जाता असताना कशी काळजी घ्यावी, गडावर गोंधळ करू नये. किल्ले पाहताना आपल्याला कुठेही इजा होणार नाही यांची काळजी घ्यावी याचे माहिती फलक दुर्गवीर प्रतिष्ठानने लावले आहेत. तसेच किल्यांवर दारूची पार्टी करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.  

 

Post a Comment

0 Comments