क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिल्पाचे अनावरणडोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पश्चिम कडील महात्मा फुलेनगर येथे महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिल्पाचे अनावरण शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे आणि जयेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर ठाकूरवाडी येथील फुलेनगर येथे नागरिकांच्या मनोरंजनासाठी `महाराष्ट्राची गुणगर्जना`संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात कै.प्रल्हाद शिंदे यांचे पुत्र चंद्रकांत शिंदे यांनी गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.


             यावेळी माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे म्हणाले, या ठिकाणी भरविण्यात आलेल्या कार्यक्रमात समाजप्रबोधन करण्यात आले असून महिलावर्ग आणि लहान मुले उपस्थित होती. फुलेनगर येथे रहिवाश्यांची अनेक दिवसांपासून मागणी होती कि महात्मा ज्योतीब फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिल्प असावे,यासाठी ठिकाणी जनतेसाठी शिल्पाचे अनावरण केले.


          प्रसिद्ध गायक चंद्रकांत शिंदे  हे गाणी गात असताना अनेकांनी नाचून आपला आनंद व्यक्त केला.यावेळी युवा सेनेचे आशु सिंह, परेश म्हात्रे, ओमकार तांबे, स्वप्नील विटकर, पवन म्हात्रे, विपुल म्हात्रे उपस्थित होते. स्वराज्य महिला मंडळ, फुलेनगर रहिवाशी मित्र मंडळ यांच्या वतीने यावेळी दिपेश म्हात्रे आणि जयेश म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments