खाडीकिनारी डेब्रिज टाकून संरक्षण भीत बांधण्यात येत असून या ठीकाणी नवीन झोपडपट्टी उभी राहण्याचा धोका - काॅग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे


ठाणे, प्रतिनिधी  : मुळातच शहरातील गटाराचे पाणी शुद्ध न करता थेट खाडीत सोडण्यात येत असल्याने खाडीचे गटार झालेले असताना आता खाडीकिनारी जवळपास 20 फूटापर्यत आत डेब्रिज टाकून त्या जागेवरच संरक्षण भींत बाधण्यात येत आहे व त्याठीकाणीच ठाणे महापालिकेच्या खर्चातून मच्छी मार्केट उभारण्यात येत आहे मात्र मुळात जवळपास असलेल्या मुख्य बाजारपेठ येथे असलेल्या मच्छिमार्केटला योग्य सुविधा देण्यात येत नसताना सीआरझेडचे उल्लंघन करून नवीन मार्केट कशासाठी बांधण्यात येत आहे? 


         असा सवाल विचारात या मार्केटला स्थानिक नागरिक आणि मच्छी विक्रेत्या महिला भगिनींचा विरोध आहे,संरक्षण भींतीकरिता खाडीकीनारी टाकण्यात आलेले डेब्रिज मुळे या ठीकाणी नव्याने झोपडपट्टी उभी राहण्याचा शक्यता असून हे डेब्रिज त्वरित हटविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा जिल्हा इंटक अध्यक्ष आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी दिला आहे.

         

          दादोजी कोंडदेव स्टेडियम समोरून खारटनरोड कडून कळवा खाडीलगत जो रस्ता जातो त्या रस्त्याशेजारी जी खाडी आहे त्या खाडीकिनारी जवळपास 20 फूट आतपर्यंत मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात आले असून खारफुटीची कत्तल करण्यात आली आहे व संरक्षण भींत बांधण्यात येत आहे,मुळातच हा किनारा सीआरझेड अंतर्गत येत असल्याने कोणतेही बांधकाम करायचे असल्यास मेरीटाईम बोर्डाची परवानगी तसेच पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र  घ्यावे लागते असे.


          असताना स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने मिलिभगत करून खाडी किनारी डेब्रिज टाकून भींत बांधली जात आहे व त्यावरच मच्छीमार्केट उभारण्याचा घाट घालण्यात आला असल्याचा आरोप सचिन शिंदे यांनी केला असून येथे टाकलेल्या डेब्रिज मुले या ठीकाणी नवीन झोपडपट्टी उभी राहू शकत्या नाकारता येत नाहीये विशेष म्हणजे स्थानिक नगरसेवकाच्या  निधीतून हे मार्केट बाधंण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.


         मात्र या बांधकामाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध असल्याने या कामाच्या बाबतीत पालिका प्रशासनाने लवकरात लवकर या बांधकामाच्या बाबतीत खरी परिस्थिती जनतेसमोर मांडावी संरक्षण भीतीकरिता टाकण्यात आलेले डेब्रिज त्वरित हटविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा सचिन शिंदे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments