जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा सभा संपन्न

       


                         

ठाणे दि. १६ ( जि.प) : खरीप हंगामात येणाऱ्या अडचणी, खते, बियाणे यांचे नियोजन, खतांचा शिल्लक साठा, विक्री करताना येणाऱ्या अडचणी, नॅनो युरियाचा वापर व त्याचे फायदे, आपले सरकार पोर्टलवर करावयाची नोंदणी, कृषिक अप वापरा विषयी माहिती आदी विषयावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. मंगळवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉ.सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा सभा संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.                             


            यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  मोहन वाघ सर, कृषि विकास अधिकारी सारिका शेलार, मोहीम अधिकारी तात्यासाहेब कोळेकर, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी तृप्ती वाघमोडे ,जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विजय तुपसौन्दर्य, कृषी विभागाचे सर्व अधिकारी ,जिल्ह्यातील सर्व खत विक्रेते, आणि कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments