‘मॅजिक मोमेंट्स’ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

■डॉ. मुकेश बत्रा यांनी 'मर्हबान – दुबई'थीम अंतर्गत दुबईचे सौंदर्य कॅमे-यात टिपले  ~


मुंबई, १२ मार्च २०२२ : व्हिक्टोरिया ममोरिअल स्कूल फॉर दि ब्लाइण्डसाठी निधी उभारण्याकरिता डॉ. बत्रा'ज ग्रुप ऑफ कंपनीजची सीएसआर शाखा डॉ. बत्रा'ज फाऊंडेशनने 'मॅजिक मोमेण्ट्स: मर्हबान – दुबई'च्या १६व्या पर्वाचे अनावरण केले. हौशी फोटोग्राफर व बहुप्रतिभावान पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. मुकेश बत्रा यांच्याद्वारे आयोजित या वार्षिक चॅरिटी फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन सिनेतारका मधू आणि रीना रॉय यांच्या हस्‍ते करण्यात आले. 


        हे फोटोग्राफी प्रदर्शन १७ मार्च २०२२ पर्यंत पिरामल आर्ट गॅलरी, एनसीपीए येथे दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहिल. जगभरात कार्य प्रसिद्ध असलेले प्रख्यात होमिओपॅथ दृष्टिहिनांच्या फायद्यासाठी आकर्षक व्हिज्युअल फोटोज कॅप्चर करत त्यांची आवड जोपासतात. यंदा त्यांचे 'मॅजिक मोमेण्ट्स: व्हिजन बीयॉण्ड साइट' फोटोग्राफी प्रदर्शन दुबई: दि सिटी ऑफ गोल्‍डला त्यांच्या भेटीदरम्यान कॅप्चर केलेल्या कलात्‍मक दृश्यांना दाखवते.


       प्रमुख अतिथी व सिनेतारका मधू म्हणाल्या, "डॉ. बत्रा'ज फाऊंडेशनच्या माध्यमातून डॉ. मुकेश बत्रा व त्यांची टीम समुदायामधील लाखो व्यक्तींच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतात. डॉ. बत्रा यांनी नेहमीच इतरांच्या सेवेप्रती आपले जीवन वाहिले आहे. या उत्कट डॉक्टरांना त्यांच्याभोवती असलेल्या लोकांना आनंद देण्याच्या स्रोताला स्वत:चा छंद बनवल्याचे पाहून अत्यंत प्रशंसनीय वाटते. मी दुबईला अनेकवेळा गेले आहे, पण ज्यापद्धतीने डॉ. बत्रा यांनी त्यांच्या फोटोग्राफ्समध्ये या शहराचे सौंदर्य कॅप्चर केले आहे, ते पाहून मला पुन्हा येथे जावेसे वाटत आहे."


       पद्मश्री पुरस्कारप्राप्त आणि डॉ. बत्रा’ज ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक डॉ. मुकेश बत्रा म्हणाले, "मी कृतज्ञ आहे की, देवाने मला लोकांची मदत करण्याची संधी दिली आहे. तसेच देवाने मला प्रतिभावान बनवले यासाठी देखील मी त्यांचे आभार मानतो, ज्यामुळे मला निसर्गामधील हे सुंदर आविष्कार पाहता येऊ शकतात आणि आपल्या कौशल्याचा वापर करत समाजाची सेवा करता येऊ शकते. निकोन एमईएने निकोन Z6II चा अनुभव घेण्यासाठी दिलेले आमंत्रण निश्चितच फोटोग्राफर म्हणून माझी प्रगती आणि फोटोग्राफीप्रती माझी आवड सार्थ ठरवते."


       डॉ. बत्रा यांच्या फोटोग्राफीचे भरपूर कौतुक करण्यात आले आहे आणि मागील १६ वर्षांमध्ये दुबई, मुंबई, नवी दिल्‍ली, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, पुणे व चंदिगड यासारख्या शहरांमधील ५० हून अधिक प्रिमिअम आर्ट गॅलरीजमध्ये दाखवण्यात आले आहेत. त्यांच्या काही अपवादात्मक कार्यांना एनसीपीएने त्यांच्या संग्रहणासाठी निवडले आहे. त्यांच्या अनेक कलेक्शन्समध्ये प्रसिद्ध उद्योगपती, राजकारणी, फॅशन डिझायनर आणि चित्रपट व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. 


      नुकतेच डॉ. बत्रा यांना या प्रदेशांचा अनुभव घेण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहित करण्याचा मनसुबा, तसेच ते नागरिकांच्या मनात निर्माण करत असलेले परस्परसंबंध याप्रती त्यांच्या संयुक्त प्रयत्नांसाठी विविध देशांनी सन्‍मानित केले आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील त्यांच्या वर्ष २०२० मधील प्रदर्शनाला दि टूरिझम बोर्ड ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि पॅन पॅसिफिक हॉटेल पर्थचे पाठबळ होते आणि त्यामध्ये प्रांताचे अद्वितीय वनस्पती व प्राणी, निसर्गरम्य सागरी किनारा यांचा समावेश होता, ज्यामधून ऑस्ट्रेलियन बुशफायर्सबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.

Post a Comment

0 Comments