भारतात ५ व्यक्तींमागे एक व्यक्ती मूत्रपिंड आजाराने ग्रस्त -मूत्रपिंड रोग विशेषज्ञ मेनाल वली


डोंबिवली ( शंकर जाधव ) भारताची लोक संख्या १३० कोटी असले तरी त्यातील सात ते आठ कोटी अर्थात पाच व्यक्तींमागे एक व्यक्ती मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त आहेअशी माहिती मूत्रपिंड रोग विशेषज्ञ मेनाल वली यांनी दिली. जागतिक किडनी अर्थात मूत्रपिंड दिनाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.          १०  मार्च हा दिवस जागतिक किडनी दिन म्हणून भारतासह संपूर्ण जगात साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश लोकांमध्ये किडनी आजारासंदर्भात जनजागृती करणे हा आहे. २००६ पासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. भारतामध्ये किडनी आजारग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. याबद्दल किडनी रोग विशेषज्ञ मेनाल वली यांनी चिंता व्यक्त केली.             जागतिक किडनी दिन दरवर्षी साजरा करताना जगातील किडनी रोगांच्या वाढत्या घटनांविषयी लोकांना जागरूक करणे हा त्यामागील हेतू आहेजेणेकरून त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जाऊ शकते. त्याचबरोबरजगभरातील मूत्रपिंडाच्या आजाराचा वाढता प्रसार थांबविणे हे त्याचे लक्ष्य आहे.     इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी (आयएसएन) आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ किडनी फाऊंडेशनने 66 देशांमध्ये 2006 पासून जागतिक किडनी दिन साजरा करायला सुरूवात केली. उत्तम आरोग्यासाठी मूत्रपिंड निरोगी असणे महत्वाचे आहे. यासाठी चांगला आहार घेणे खूप महत्वाचे आहे. मूत्रपिंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून बर्‍याच वेळा हा आजार गंभीर स्वरूप धारण करण्याची भिती असते. मूत्रपिंड हा आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहे.        ते शरीराची घाण बाहेर काढण्याचे कार्य करतात. अशा परिस्थितीत जेव्हा किडनीत एक प्रकारची समस्या उद्भवते तेव्हा शरीरातील घातक पदार्थ शरीरातून बाहेर पडत नाही आणि किडनी आजार होण्याचा धोका वाढू लागतो. हे मूत्रपिंडाच्या आजारांवरील लोकांना आणि किडनीसाठी चांगले असणारे खाद्यपदार्थ हे जागतिक किडनी दिनाच्या मोहिमेद्वारे सांगण्यात आले आहे. जेणेकरून जगभरात किडनीच्या आजांराच्या प्रकरणांमध्ये घट होऊ शकेलअसेही मूत्रपिंड रोग विशेषज्ञ मेनाल वली यांनी सांगितले.     फळे व सर्व प्रकारच्या भाज्यांचा आपला आहारात समावेश असल्यास मूत्रपिंडाच्या आजारापासून आपले रक्षण करतात. परंतु ज्यांना आधीच मूत्रपिंडाचा त्रास आहे त्यांनी आपल्या आहारात सफरचंदनाशपातीपपईपेरू इत्यादींसारख्या कमी पोटॅशियम पदार्थांचा समावेश केला पाहिजे. मधुमेह आणि रक्तदाब अनियंत्रित असल्यास मूत्रपिंड आजार बळावला जातो. कोणत्याही आयुर्वेदिकऑलोपेथिकपेन किलरसारखी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्यास त्याचा मूत्रपिंडावर निश्चित परिणाम होऊ शकतोअसेही विशेषज्ञ मेनाल वली म्हणाले.
  


         कायमचा व तात्पुरता असे मूत्रपिंड विकाराचे दोन प्रकार असतात. तात्पुरत्या विकारात रुग्ण रुग्णालयात दाखल असेल आणि लघवीला झालेला जंतूसंसर्गमलेरियाडेंग्यूगॅस्ट्रो एंटेरिटिस अशा इतर गोष्टी उद्भवलेल्या असतात. अशा रुग्णाला त्या काळापुरता मूत्रपिंड विकार निर्माण होऊ शकतो व प्रसंगी डायलिसिस देखील लागू शकतो. पण तो कायमचा मागे लागत नाही. ज्या रुग्णांना क्रॉनिक किडनी डिसिज असतोअर्थात त्याचे मूत्रपिंड हळूहळू खराब होत गेलेले असते त्याला कायम डायलिसिस करण्याची वेळ येऊ शकतेअसेही ते म्हणाले.     सर्वसाधारणपणे मूत्रपिंडाचे कार्य ते 10 टक्के एवढेच सुरू असेल तेव्हा डायलिसिसचा निर्णय घेतला जातो. पण हल्ली डायलिसिसच्या पद्धती सुधारल्या आहेत आणि कमी वेदनांमध्ये व पथ्य पाळून वर्षांनुवर्षे नियमित घेणे शक्य होते. मूत्रपिंडाचे कार्य ते 10 टक्केच उरले की त्यांना डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा पर्याय सुचवला जातो. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले कित्येक रुग्ण बराच काळ तपासत नाहीत. रक्तदाबाची तपासणी मूत्रपिंड विकारासाठीही गरजेची असते.       ज्यांना अॅेनिमिया आणि उच्च रक्तदाब हे आजार एकाच वेळी असतात त्यांना मूत्रपिंडाच्या आजाराची शक्यता वाढते. रक्त आणि लघवीच्या साध्या तपासण्या मूत्रपिंड विकारासाठी खूप महत्त्वाच्या. त्यात युरियाक्रिएटिनिनहिमोग्लोबिन व युरिक अॅयसिड या तपासण्या प्रामुख्याने करतात. अंगावर सूज आहे का हे पाहणेही गरजेचे असते.        मूत्रपिंड विकाराचा धोका असलेल्यांना लघवीची एसीआर तपासणी (अल्ब्युमिन-क्रिएटिनिन रेशो/युरिन मायक्रो अल्ब्युमिन) करतात. त्यातून मूत्रपिंडाच्या आजाराची शक्यता कळते. मूत्रपिंडाचा त्रास असल्याचे समजल्यावर सोनोग्राफीही केली जातेअशीही माहिती मूत्रपिंड रोग विशेषज्ञ मेनाल वली यांनी दिली.

Post a Comment

0 Comments