वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी डिजिटल इक्वीलायझर प्रोग्राम


डोंबिवली ( शंकर जाधव )  अमेरिकन इंडिया फाऊंडेशन ट्रस्ट तर्फे स्टेम इंटरवेशन,डिजिटल इक्वीलायझर प्रोग्राम    इयत्ता ९ वी ते १२ वी साठी आयोजित करण्यात येतो.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा,विज्ञान विषयाबद्दल गोडी वाढावी, विद्यार्थ्यांनी नवनविन प्रयोग करून पहावेत,त्यांनी संशोधन करावे यासाठी त्यांना Stem Kit Box ( एकूण६३ kit) ,Lenovo Laptop Computer System,व Led Projector देण्यात येते.हा  कार्यक्रम  डोंबिवली पूर्वेकडील राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विद्यामंदिर विद्यामंदिर गोपाळनगर माध्यमिक नेहरू मैदानात घेण्यात आला.


           शाळेच्या मुख्याध्यापिका  विद्या कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना या ट्रस्टचा हेतू सांगितला.यांच्यातर्फे अनेकविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.क्लस्टर समन्वयक म्हणून रूपाली रोटे,अतिश पाटील व सुचित साळवी हे उपस्थित होते.या योजनेचे महत्त्व त्यांनी सांगितले.व त्यांनी विद्यार्थ्यांना काही प्रयोग करून दाखवले व विद्यार्थ्यांनी ही प्रयोग करून पाहिले .

Post a Comment

0 Comments