अॅक्सीस बँकेचे एटीएम मशीन फोडणाऱ्यास रंगेहाथ अटक

 


डोंबिवली  ( प्रतिनिधी ) मानपाडा पोलिसांनी एटीएम फोडणाऱ्या चोरट्यास रंगेहाथ पकडून त्याच्याकडून चोऱ्या घरफोड्या करण्यासाठी लागणारी हत्यारे हस्तगत केली आहेत. राहुल प्रमोद चोरडीया  (35, रा. सद्या 110, प्रिन्स सिटी, सुकीया इंदोर, तर कायम रा. 218, क्लर्क कॉलनी, परदेशी पुरा, नंदानगर, इंदोर, राज्य मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे. चोरी करण्याचा या चोरट्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या सतर्कपणामुळे अयशस्वी ठरला आहे.


     पोलिस हद्दीत घरफोडी, चोरी यासारख्या घटना घडू नये यासाठी हद्दीत सतर्क पेट्रोलिंग करण्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी सर्व पेट्रोलिंगच्या अधिकारी व अंमलदार यांना सुचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे पोलिस पथकांनी सतर्कपणे हद्दीत गस्ती सुरू केल्या आहेत. रविवारी मध्यरात्री दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मानपाडा सर्कलचे ठिकाणी असलेल्या एक्सिस बँकेचे एटीएमचे शटर हे बंद अवस्थेत होते. तथापी या एटीएमच्या आतून ड्रीलमशिनचा आवाज येत असल्याचे पेट्रोलिंग करणाऱ्या पथकाच्या निदर्शनास आले. 


     या पथकाने लागलीच एटीएम मशिन लावलेले शटर ठाठावले असता, आतील ड्रीलमशिनचा आवाज बंद झाला. त्यावेळी पेट्रोलिंगचे अधिकारी व अंमलदार यांनी एटीएमचे आंतमध्ये नक्की चोर असल्याचा संशय बाळावल्याने त्यांनी सतर्कपणे एटीएमचे शटर उघडले असता, आतमधील इसमाने पोलीसांना धक्का मारुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी पाठलाग करून सदर इसमास पकडून चौकशी करून झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या बॅगमध्ये एटीएम फोडण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. 


         सदर साहित्य एटीएम मशिन तोडून त्यातील पैसे चोरण्यासाठी जवळ बाळगले असल्याची कबूली दिली. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या राहुल चोरडीया याच्या विरोधात 454, 380, 511 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या चोरट्याकडून एटीएम फोडण्यासाठी लागणारे 14 हजार 300 रूपये किंमतीचे ड्रील मशीन, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, कटावणी, होल्डर पिन, एमसील अशा वस्तु हस्तगत करण्यात आल्या आहेत. 


        हा चोरटा मुळचा मध्यप्रदेश राज्यातील राहणारा आहे  त्याने महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील एटीएम मशीन तांत्रीक पध्दतीने फोडून गुन्हे केले असावेत असा संशय आहे. त्याप्रमाणे पुढील तपास चालू आहे. त्याचे शिक्षण एम. कॉमपर्यंत झालेले असून तो या पूर्वी इंदोरमधील एसआयएससीओ (SISCO) नामक कंपनीमध्ये काम करत होता. ही कंपनी एटीएम मशीनमध्ये कॅश लोड-अनलोडचे काम करत असल्याचे व पो नि शेखर बागडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments