ठाण्यात खारेगाव येथे प्रथमच अस्मिता इनडोअर फोटोग्राफी स्टुडिओ

■अस्मिता स्टुडिओचे उदघाटन कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते


ठाणे, प्रतिनिधी  :-  ठाण्यात खारेगाव येथे प्रथमच फोटोग्राफी साठी  स्टुडिओ उभारण्यात आला आहे या स्टुडिओचे नाव अस्मिता स्टुडिओ असून, त्याचे उदघाट्न कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले, या उदघाट्नच्या कार्यक्रमाला मराठी अभिनेत्री रुपाली भोसले तर  माजी नगरसेविका प्रमिला केणी व मनाली पाटील या उपस्थित होत्या ,ठाण्यामध्ये अशा प्रकारचा हा नवीनच कॉन्सेप्ट असून फोटोग्राफी, इनडोअर शूटिंग प्री मॅरीज शूटिंग, वेडिंग शूटिंग, बर्थडे शूटिंग अशा प्रकारच्या शूटिंग व फोटोग्राफी या स्टुडिओत होणार आहे.


         अस्मिता शिंदे यांच्या मालकीचा हा स्टुडिओ असून, तिन ते चार वर्षांपासून त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत,मुबंई मध्ये अंधेरी वर्सोवा, गोरेगाव फिल्मसीट येथे अशा प्रकारचे स्टुडिओस आहेत पण त्यांचे चार्जेस खूप जास्त आहेत,त्या मानाने ह्या स्टुडिओ मध्ये चार्जेस फार कमी असून सर्वसामान्यांना ते परवडण्यासारखे आहे,फॅशनच्या क्षेत्रात तरुण तरुणींचा जास्त वावर असतो.


        सोशल मीडिया मुळे आणि नविन तंत्रज्ञानामुळे मॉडेलिंग व इतर क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुणांना या स्टुडिओचा खूप फायदा होऊ शकतो ,तरी अशा प्रकारचे फोटोसेशन करणाऱ्या मंडळींनी या स्टुडिओला भेट देण्यास काही हरकत नाही, त्यांनी एकदा येऊन खात्री करावी व इथे शूट कराव असी विनंती अस्मिता शिंदे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments