कल्याण मधील अबोली धावल्या कर्जत मधील अबोलीच्या मदतीसाठी पुरुषी मक्तेदारीत मिळवून दिला न्याय


कल्याण : पुरुषी मक्तेदारी असलेल्या रिक्षाच्या व्यवसायात कर्जतमध्ये अबोली रिक्षाच्या माध्यमातून आपल्या पायांवर उभ्या राहणाऱ्या महिला रिक्षा चालकाला पुरुष रिक्षाचालकांकडून व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात येत होता. अशा या अबोली रिक्षाचालक महिलेच्या मदतीसाठी कल्याण मधील अबोली रिक्षाचालक महिला धावून जात तिला न्याय मिळवून दिला आहे.  


रिक्षाचे परवाने अबोलीच्या माध्यमातून देत शासन निर्णयामुळे महिला रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करीत पुरूषांच्या खांद्याला खांदा लावित रिक्षा चालवित रोजगाराच्या प्रवाहात आल्या व स्वंयमपूर्ण बनत आपल्या संसाराचा गाडा हाकीत आहेत. कर्जत मध्ये देखील अबोलीच्या माध्यमातून निशा गुप्ता हि महिला रिक्षा व्यवसायात उतरली आहे. 


मात्र पुरुष रिक्षा चालकांकडून तिला त्रास देण्यात येत असून स्टॅन्डवर रिक्षा लावण्यास मज्जाव केला जात होता. हि बाब कल्याण मधील महिला रिक्षाचालकांना समजताच  जागतिक महिला दिनाच्या तीन दिवस आगोदर कल्याणातील अबोली रिक्षाचालक  संघटनेच्या महिला रिक्षाचालक आपल्या अबोली रिक्षाचालक महिला सहकारीच्या मदतीसाठी कर्जत येथे जाऊन पुरुष रिक्षाचालकांना समज दिली.


        महिला आणि पुरूष सर्व एक समान आहेत कोणीही तिला रिक्षा स्टँड वरून बाहेर काढू शकत नाहीत. आणि इथून पुढे जर तिला त्रास दिला तर आम्ही सर्व आबोली रिक्क्षा चालक महिला  आबोली रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी भगत यांच्या मार्गदर्शनानुसार आंदोलनं सुद्धा करू असा सज्जड इशारा रिक्षा स्टँन्ड वरील उपस्थित पुरुष रिक्षा चालकांना दिला. यामुळे त्यातील काही पुरूष रिक्षा चालक यांनी तिला आता त्रास होणार नाही याकडे लक्ष दिले जाईल असे सांगितले.


कल्याण डोंबिवली आबोली रिक्षा संघटनेच्या पदाधिकारी शारदा ओव्हाळरक्षा शिंन्देकुंदा काळेआरती पवारभाग्यश्री बोडीविलेकान्हो पात्रा या महिला रिक्षाचालकांनी कर्जतला जात तेथील महिला रिक्षा चालकाला न्याय मिळवून दिला असून कर्जत मधील इतर महिला देखील रिक्षा व्यवसायात पदार्पण करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.तर  कर्जतच्या त्या आबोलीचा प्रश्न मार्गी लागल्याने जागतिक महिला दिनानिमित्त महिला आपल्या हक्कासाठी सजग झाल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.

Post a Comment

0 Comments