टिटवाळ्यात रिंगरुटमध्ये अडथळा ठरणाऱ्या ५ रुम, ३६ अतिक्रमणे, ६० होर्डिंग्ज वर मनपाचा होताडा


कल्याण  : टिटवाळ्यातील मांडा पश्चिमेतील आझाद नगर परिसरातील रिंगरुटमध्ये अढथळा ठरणाऱ्या ५रूम निष्कसित करण्याची धडक कारवाई गुरुवारी करण्यात आली. टिटवाळा पूर्वेतील गणेश मंदिर रोड दरम्यान  निमकर नाका ते गणेश मंदिर रोड पर्यंत ३६अतिक्रमणे मनपाच्या पथकाने हातोडा चालवित भुईसपाट केल्याने रस्त्याच्या पदपाथाने मोकाळा श्वास घेतला असल्याचे चित्र दिसत होते.  तसेच अनधिकृत ग्रबॅनर पोस्टर होर्डिंग यावर देखील कारवाई करण्यात आली असून ६० अनाधिकृत होर्डिंग्ज मनपाच्या अनाधिकृत कारवाई पथका कढुन काढण्यात आली.                                  केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रस्त्यावरील अनाधिकृत अतिक्रमणे, तसेच शहर विद्रुपीकरणात भर घालणारे अनाधिकृत होर्डिंग्ज हटविण्याच्या  अमंलबजावणी प्रभावी पणे राबविण्याच्या सूचना केल्या असून सहाय्यक आयुक्त "अ" प्रभागक्षेत्र सुहास गुप्ते यांनी अ प्रभागक्षेत्राच्या अनाधिकृत बांधकाम पथकासह  धडक कारवाईचा बडगा उचलित गणेश मंदिर रोड दरम्यानची अनाधिकृत चिकनच्या टपर्या, अनाधिकृत दुकाने  अनाधिकृत ठेले, अनाधिकृत हातगाड्या अशी ३६अतिक्रमणे जमीनदोस्त केल्याने पदपाथ मोकळा झाल्याचे दिसत होते.


          "अ" प्रभागक्षेत्राचे सह्यक आयुक्त  सुहास गुप्ते यांच्या पथकाने केलेल्या अनाधिकृत अतिक्रमणे, अनाधिकृत होर्डिंग्जच्या कारवाई मुळे  अनाधिकृत अतिक्रमणे   करणाऱ्या माफिया सह अनाधिकृत होर्डिंग्ज लावणार्या चे या कारवाईने धाबे दणाणले आहे.             


           याकारवाई साठी "अ" प्रभागातील अनधिकृत बांधकाम नियंत्रण खात्याचा कर्मचारी वर्ग, महानगरपालिकेचे तीन प्रभागाचे पोलीस अंमलदार एक जेसीबी  असा फौज फाटा होता. "आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार कारवाईचा बडगा सुरु राहणार असुन अनाधिकृत अतिक्रमणे, अनाधिकृत होर्डिंग्ज वर कारवाई सुरू असणार असल्याचे "अ" प्रभागक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त  सुहास गुप्ते यांनी संपर्क साधला असता सांगितले.

Post a Comment

0 Comments