वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्क्षा चालकावर दंडात्मक कारवाई चा बडगा

 

■तब्बल  एका दिवशी विशेष संयुक्त कारवाईत ८६ रिक्क्षा चालकांकडून  १ लाख ४० हजार ३००रू. आकारण्यात आला दंड...                              कल्याण :-  कल्याण स्टेशन परिसरात शुक्रवारी वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेशिस्त रिक्क्षा चालकावर व उपप्रादेशिक परिवहन विभाग , कल्याण शहर वाहतूक उपशाखा कल्याण विशेष संयुक्त कारवाई करीत   तब्बल एक लाख चाळीस हजार तिनशे रू दंड वसूल केल्याने बेशिस्त वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्क्षा चालकांचे धाबे दणाणले  असल्याचे दिसत आहे.            

                          
         शुक्रवारी कल्याण स्टेशन परिसरात विशेष  संयुक्त कारवाई उपप्रादेशिक परिवहन विभाग , कल्याण शहर वाहतूक उपशाखा कल्याण   यांच्या वतीने करण्यात आली. रस्त्यावर बेशिस्तपणे उभी केलेली जाणारी रिक्क्षा, गणवेश परिधान न करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणारे गणवेश, बॅच बिल्ला, वाहन परवाना आणि रिक्क्षा च्या कागदपत्रांची पूर्तता नसणे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा  उचलण्यात आला.  

 

           या विशेष संयुक्त कारवाईत प्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण यांच्यामार्फत १७ रिक्क्षा चालकावर वाहतूक नियमांची उल्लंघना प्रकरणी कारवाई करून ८९,२०० रू. दंड आकारण्यात आला तसेच शहर वाहतूक उपशाखा कल्याण मार्फत ६९ रिक्क्षा चालकावर वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रकरणी  कारवाई करून  ५१,००० रु. दंड आकारण्यात आला. एकूण ८६ रिक्क्षा चालकांवर केलेल्या विशेष संयुक्त कारवाईत एक लाख चाळीस हजार तीनशे रु. दंड आकारण्यात आला.          
               

     "  शहरातील अनेक रिक्षाचालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास येत असल्याने   त्यामुळे अशा बेशिस्त रिक्षाचाकांवर परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिस एकत्रित कारवाई कारवाईचा बडगा सुरु राहणार असून रिक्षाचालक, मालक यांनी स्वच्छ गणवेश, बॅच बिल्ला, वाहन परवाना आणि रिक्षाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे ,वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन महेश तरडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण शहर वाहतूक उपशाखा कल्याण यांनी करीत जे रिक्षा व्यावसायिक या गोष्टींची पूर्तता करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संपर्क साधला असता यानिमित्ताने सांगितले."

Post a Comment

0 Comments