कल्याण मध्ये आढळला दुर्मिळ चित्रांग नायकूळ जातीचा साप वॉर फाउंडेशनने दिलं जीवनदान


कल्याण : कल्याण चिंचपाडा येथे  एका दुकानात साप शिरल्याची माहिती वॉर फाऊंडेशनच्या  हेल्पलाईन वर मिळाली. त्यानंतर सर्पमित्रांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या सापाला पकडलं व हा साप वनविभागाच्या ताब्यात दिला. विशेष म्हणजे चित्रांग नायकूळ जातीचा साप हा अत्यंत दुर्मिळ असून यापूर्वी २०२० मध्ये कळवा येथे या सापाची नोंद झाली होती. 


        कल्याण मध्ये पहिल्यांदाच या जातीचा  साप आढळून आल्याच सर्पमित्रांनी सांगितलं. वाढत्या तापमाना मुळे साप मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत, अनेकदा नागरिक भीतीपोटी सापाना मारतात तर अनेकदा सर्पदंशाच्या घटना घडतात. सर्प व मानवाचा संघर्ष टाळण्यासाठी वॉर फाऊंडेशनचे प्राणी मित्र आणि वन विभाग कार्यरत असल्याचे पीयूष पालव यांनी यानिमित्ताने सांगितले.

Post a Comment

0 Comments