केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी

■सी.डी.देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत पार पडल्या 'मॉक इंटरव्ह्यू' 'मॉक इंटरव्ह्यू'साठी तज्ञ परीक्षकांचे मार्गदर्शन ; विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद


ठाणे | केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिका संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत नुकतेच मॉक इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते.


            केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) मुलाखतीचे व त्यामध्ये यश संपादन करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड दडपण व मनात भिती असते.  विद्यार्थ्यांमध्ये मुलाखतीबाबत असलेली भिती दूर व्हावी व त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीस यशस्वीपणे सामोरे जावे यासाठी या मॉक इंटरव्ह्यूचे आयोजन केले आहेत. 


          या मुलाखतीच्या सत्रात ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, एमएमआरडीएचे सहआयुक्त राहूल कर्डिले, कस्टम उपआयुक्त अक्षय पाटील, सहसंचालक, गुप्तवार्ता महसूल विभागाच्या राजलक्ष्मी कदम, उपसंचालक सुचना व प्रसारण विभागाचे राहूल तिडके, विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. मृदुल निळे यांनी परीक्षार्थीच्या मॉक इंटरव्हिव घेतल्या.


              या सत्रात इंटरव्हिवसाठी आलेल्या तज्ञ परीक्षकांनी मॉक इंटरव्ह्यूकरिता आलेल्या विद्यार्थ्यांचे 40 मिनिटे मुलाखत घेतली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) मुलाखतीकरिता कोणत्या बाबी आवश्यक आहेत?, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कशाप्रकारे द्यावीत? तसेच मॉक इंटरव्ह्यूमध्ये दिलेल्या उत्तरामध्ये 'कशा पध्दतीत बदल केला पाहिजे'? 'देहबोली कशापध्दतीने असली पाहिजे'? '


          हातवारे कशा पध्दतीने हवे'? 'आयकॉन्टॅक्ट कशापध्दतीने कसा असला पाहिजे'? या व इतर अनेक बाबींबाबत मुलाखतीस आलेल्या विद्यार्थ्यांना सखोल असे बहुमूल्य मार्गदर्शन केले. सदर मुलाखतींचे चिंतामणराव प्रशासकीय देशमुख संस्थेने अत्याधुनिक पध्दतीने व्हिडीओ रेकॉर्डिंग केलेले असून ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आले, जेणेकरुन मुलाखतीस झालेल्या चुकांचे विद्यार्थ्यांना योग्य वेळेत मूल्यमापन करता येईल.


          सदरच्या मॉक इंटरव्ह्यू कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ठामपाचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपआयुक्त मनिष जोशी, संचालक महादेव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील अधिकारी / कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.


            केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीबाबत मार्गदर्शन हवे असल्यास, संस्थेचे संचालक व संस्थेच्या मुख्य केंद्रास संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments