जीवाची पर्वा न करता आत्महत्या करणाऱ्याचे वाचविले प्राण


कल्याण : विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन वर आज थरारक घटना घडली असून दुपारच्या सुमारास फलाटावर उभ्या असलेल्या तरुणाने आत्महत्या करण्याच्या हेतूने मेल शिरकाव करीत असतानाच ट्रेकमध्ये उडी घेतली मात्र कर्तव्य बजावीत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांने जीवावर उदार होत आत्महत्या करणाऱ्या तरुणाला ढकलून देत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या दुर्घटनेने पासून दोघेही बचावले.


           कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या ऋषिकेश माने पोलीस शिपाई असून विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन फलाटावर ते कर्तव्य बजावत होते. दुपारच्या सुमारास विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन मध्ये एक तरुण उभा असताना लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सुटलेली मधुराई एक्सप्रेस दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी रेल्वे स्टेशन मध्ये शिरकाव केला असता .


      या तरुणाने आत्महत्या करण्याच्या बेताने फलाटावरून मध्ये उडी घेतली याच दरम्यान पोलीस शिपाई ऋषिकेश माने यांनी मेल शिरकाव करीत असल्याचे पाहूनही त्याचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत ट्रॅक वर उडी मारत आत्महत्या करणाऱ्या तरुणाला स्वतः बाजूला सारले.


        रेल्वेच्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून स्वतःचा जीव धोक्यात घालून आत्महत्या करणाऱ्या तरुणालाही वाचविण्यास यश प्राप्त केले आहे. धाडस दाखवीत आत्महत्या करणाऱ्या तरुणांचे प्राण वाचविणारा पोलीस शिपाई ऋषिकेश माने त्यांचे सीनियर इन्स्पेक्टर वाल्मिक शार्दुल यांनी विशेष कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments