एस एस टी महाविद्यालयाच्या जोडीला पुढे सरसावले मुंबई विद्यापीठ - एन एस एस स्वयं सेवकांसाठी भव्य शिबिराचे आयोजन


कल्याण : मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि एस. एस. टी. कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्थरीय सातदिवसिय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  "आजादी का अमृत महोत्सव" या संकल्पनेवर आधारित सदर शिबिर दिनांक २० मार्च ते २६ मार्च २०२२ पर्यंत राबवण्यात आले. 


या शिबिरात तब्बल १३ वेगवेगळ्या झोनमधील मुलांनी सहभाग घेतला होता. तसेच ९३ कॉलेजमधील एकूण १७२  विद्यार्थी येथे उपस्थित होते. संपूर्ण शिबिराचा पहिला दिवस हा   खास ठरला. कारण रत्नागिरी, रायगड  सारख्या वेगळ्या वेगळ्या झोनमधून एन एस एसचे स्वयंसेवक इथे आले होते. 


या सर्व  विद्यार्थांची पहिल्याच दिवशी नोंदणी करण्यात आली. तसेच त्यांची वेगवेगळ्या गटात विभागणी देखील केली गेली. संपूर्ण शिबिरात विद्यार्थ्यांना नवनवीन टास्क दिले जात होते. जे खरोखरच आव्हानात्मक असून मजेशीर देखील होते. प्रत्येक गटाला एक दिवस जेवण बनवण्याचे काम सोपवले जात  होते. 


अशात या स्वयंसेवकांना डॉ.विजय कुकरेजा यांनी योगाचे ज्ञान दिले. तसेच एन एस एस जिल्हा समन्वयक प्रा जीवन विचारे यांनी सेल्फ डिफेन्सचे मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेल्या या विद्यार्थ्यांना हर्षल सुर्यवंशी यांनी अभिनय आणि एकांकीके बद्दल देखील माहिती दिली. तसेच भारती शिंगोळे यांनी क्रांतिवीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्वातंत्र्यातील योगदाना  बद्दल सांगितले. 


त्याचबरोबर प्रा निखिल कारखानीस, प्रा क्रांती उके, प्रा जितेंद्र भामरे, प्रा तुलसीदास मोकल, डॉ. राहुल मराठे, प्रा रेणू वर्मा डॉ बी बी जाधव, डॉ विजेंद्र शेखवत,  प्रा दीपक पोंक्षे अशा अनेक मान्यवरांनी भारतीय स्वातंत्र्य आणि स्वातंऱ्यानंतरच्या संबंधित  अनेक वेगवेगळ्या  मुद्द्यांवर व्याख्यानातून  मार्गदर्शन केलं. 


यासह या जगात असलेली अंधश्रद्धा आणि त्यावर आवाज उठवणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील  राजू कोळी यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन घडवण्याचे काम केले. राजू कोळी यांनी अंधश्रद्धेवर अनेक स्वरचित गाणी  गायली. तसेच त्यांच्या व्याख्यानाला देखील उपस्थित विद्यार्थ्यांनी मोठी दाद दिली. 


या यासह महाराष्ट्र राज्य रा स यो सल्लागार समितीचे सदस्य  अंकीत प्रभू  यांनी देखील विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. महाराष्ट्र  राज्य संपर्क अधिकारी डॉ प्रशांत वणांजे यांनी देखील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मत व्यक्त केले. 


शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच एस एस टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  पुरस्वानी तसेच भारत कॉलेजच्या प्राचार्या डॉ. नितु कपूर, डॉ विजय कुकरेजा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
त्याचबरोबर शिबिराच्या पहिल्याच दिवशी मुरबाड विधानसभा मतदारसंघ आमदार किसन कथोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 


 शिबिराच्या समारोप प्रसंगी आदर्श महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैदेही दप्तरदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे  हॆ प्रमुख पाहुणे म्हणून उपास्थित होते . याच बरोबर डॉ. धारवडकर,  पामर शेटे,  मिलिंद धारवडकर हॆ ही उपस्थित होते.. समरोप समारंभा मध्ये डॉ वैदेही दप्तरदार यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले त्यांचा  हस्ते बक्षीस वितरण देखील पार पडले. 
 

या  भव्य शिबिराचे आयोजन  मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव आणि रा स यो चे प्रभारी संचालक सुधीर पुराणिक, रा स यो चे कार्यक्रम अधिकारी रमेश देवकर, ओ एस डी प्रा सुशील शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने ठाणे जिल्हा समन्वयक प्रा जीवन विचारे, एस एस टी महाविद्यालयातील रा स यो चे कार्यक्रम अधिकारी प्रा  अनिल तेलिंगे, प्रा मयूर माथूर, प्रा संजय परतोले, प्रा योगेश पाटील, प्रा अंकित उपाध्याय यांनी स्वयंसेवक रमेश सरोज, सदान जावरे, निशांत मेश्राम, अंकुश सोनवणे, प्राची वैश्य , अंकिता भोईर, निकिता भोईर यांनी परिश्रम घेऊन हे भव्य शिबिर यशस्वी रित्या पार पाडले.

Post a Comment

0 Comments