शिवसेनेच्या होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांची अफाट गर्दी

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) जागतिक महिला दिनानिमित्त शिवसैनिक संदेश पाटील आणि रसिका पाटील यांच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर चौक येथे पार पडलेल्या हळदीकुंकू समारंभ आणि होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांची अफाट गर्दी दिसली. या कार्यक्रमात वृषाली श्रीकांत शिंदे यांची विशेष उपस्थित होती.यावेळी  सुमारे पाच हजार महिलांनी होम मिनिस्टर कार्यक्रमात भाग घेतला. यात प्रथम क्रमांक सोन्याची नथ आणि पैठणी, दुसरा क्रमांक पैठणी आणि दोन हजार आणि तृतीय क्रमांक पैठणी आणि एक हजार रुपये असे बक्षीस ठेवले होते. 


       या कार्यक्रमात सेलिब्रेटींनीही आमंत्रित केले होते. यावेळी शिवसेना उपशहर संघटक हरीश्चंद पाटील यांसह अनेकांनी अथक मेहनत घेतली. यावेळी शिवसैनिक संदेश पाटील म्हणाले, शिवसेना सदैव जनतेच्या पाठीशी उभी राहिली आहे. कोरोना काळात शिवसैनिकांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी धावपळ केली होती. हे जनता विसरणार नाही. 


     २४ तास जनतेसाठी तत्पर असलेल्या शिवसेनेला पालिकेच्या निवडणुकीत नागरीक भरभरून मतदान करतील.महिलांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केल्याने महिला वर्गानी शिवसैनिक पाटील यांचे आभार मानले.  

Post a Comment

0 Comments