डोंबिवलीत मोठ्या उत्सवात होळी उत्सव साजरा

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) दोन वर्षांच्या कोरोना महामारीतुन काही प्रमाणात सण-उत्सव साजरा करण्यासाठी मोकळीक मिळाली.महात्मा फुले रोडवरील दहन करूया वाईट विचारांचे, दहन करूया वाईट प्रवृत्तीचे या घोषणानुसार भाजपाचे कल्याण डोंबिवली ओबीसी सेलचे उपाध्यक्ष दिनेश जधाव यांनी होळी उत्सवाचे  आयोजन केले होते. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उत्सवाच्या ठिकाणी भेट देऊन दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. एका अनोख्या शिस्तबद्ध पद्धतीने साजरा झालेल्या या उसत्वाची शहरात चर्चा होती.
 

           डोंबिवलीत सर्वच वयोगटातील मुले, तरुण, जेष्ठ महिला पुरुषांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. मात्र ज्या तरुणांची पाण्याचे फुगे फोडण्याच्या क्रियेला कुठेच थारा नव्हता. सकाळी तरुण-तरुणीचा गट स्टेशन आसपासच्या रोडवर फेरफटका मारून एकमेकांना कोरडा रंग लावण्याचा आनंद घेताना दिसून आले. मात्र काही गृहनिर्माण संकुलातून रंगीबेरंगी पाण्याच्या रंगात मौजमजा करण्यावर भर होता. 


           डोंबिवली पूर्वेकडील कान्होजी जेधे मैदान  (भागशाळा) येथे साजरा झालेल्या या आनंदात अनेकांना नागरिक सहभागी झाले होते. भरपूर प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी डीजेच्या तालावर अनेकांनी नाचत सण साजरा केला.

Post a Comment

0 Comments