डोंबिवलीतील फेरीवाल्यांकडून रक्तदाना मार्फत समाजकार्य

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना काळात टाळेबंदीने आर्थिक स्थिती बिकट होऊनही समाजकार्यमार्फत अनेकांनी  आपले काम अविरतपणे सुरु ठेवले आहे.डोंबिवलीतील एका फेरीवाल्याने आपल्या वाढदिवस साजरा करताना समाजकार्य करण्याचे ठरविले.२२ वर्षीय अभिषेक गुप्ता याने डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसरात रक्तदान शिबीर भरवले होते. यात १०० पेक्षा जास्त फेरीवाल्यांनी रक्तदान केले.


          भारती फाउंडेशन आणि हेमचंदभाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेश सोनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाॅज संस्थेचे अध्यक्ष निलेश भणगे, यांसह राहुल गुप्ता, संतोष प्रसाद, बिर्जू महातो, उषा मुल्ला यांचे शिबिराच्या यशस्वीतेकरता अथक मेहनत घेतली. तर यावेळी गरिबांना जेवण देण्यात आले.

Post a Comment

0 Comments