१८व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य महोत्सवात राहनाळ शाळेचे "आमचा मित्र" हे बालनाट्य दिमाखात सादर


कल्याण : १८ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य महोत्सवात राहनाळ शाळेचे "आमचा मित्र" हे बालनाट्य दिमाखात सादर झाले.अजय पाटील लिखित दिग्दर्शित "आमचा मित्र" हे बालनाट्य घडतंय ते एका खेडेगावामध्ये. गावातील रामजी नावाची व्यक्ती पैशांची निकड म्हणून आपलं शाळेजवळच एक मोठं झाड गावातील काही लोकांना विकून टाकतो. ती माणसं ते झाड तोडायला येतात, तेव्हा शाळेत शिकणारे मंजू, माया, सरिता, राहुल हे विद्यार्थी झाड तोडायला प्रतिकार करतात. या विद्यार्थ्यांना त्या झाडाबद्दल नितांत प्रेम असतं. त्यांच्या अनेक आठवणी या झाडाशी जोडलेल्या आहेत.


म्हणून ते झाड तोडले जात आहे याचं त्यांना प्रचंड वाईट वाटतं. अशावेळी शाळेमध्ये किंवा घरांमध्ये त्यांचे लक्ष लागत नाही. जेवणावरची त्यांची वासना उडते. हे चौघे मित्र ते झाड वाचवण्याचा प्रयत्न करतात. मंजू पुढाकार घेऊन ते झाड वाचवते. सोबत शाळेतील शिक्षिकामंजूची आईझाड वाचवण्यासाठी कसा संघर्ष करतात याची कथा म्हणजे "आमचा मित्र."


लेखक दिग्दर्शक अजय पाटील यांनी अत्यंत संवेदनशीलपणे हे नाटक लिहिले असून तेवढेच संवेदनशीलपणे सादर केले आहे. खेडेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना थिएटर म्हणजे काय हे माहीत नाही. परंतु त्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावात्यांना पुढील शिक्षणासाठी या आत्मविश्वासाचा उपयोग व्हावा याच उद्देशाने हे बालनाट्य सादर करण्याचा अजय पाटील यांचा मानस होता. तांत्रिक बाबींना फारसा महत्त्व न देता विद्यार्थ्यांच्या शारीरिकअंगिक अभिनयावर या बालनाट्यात जास्त लक्ष केंद्रित केलं आहे.


बालनाट्यचे नेपथ्य अनघा दळवीप्रकाश योजना विशाल घनगावरंगभूषा किरण यांनी नाटकाला साजेशी अशी केली आहे. बालनाट्यात सिद्धी देसाईश्वेता टोळेपूजा ठाकूरआविष्कार मानेराधिका पाटीलश्वेता शिंदेनितेश चव्हाणअनिकेत आंबेकरअर्जुन मावकरसोहम झगडेप्रणाली येडगेमीरा वरकडअशा वीस मुलांनी अभिनय केला आहे.  खेडेगावातील मुलांनी शहरात जाऊन इतक्या मोठ्या थिएटरमध्ये दिमाखात आणि अत्यंत सकसपणे बालनाट्य सादर केले आहे.

Post a Comment

0 Comments